पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा आता संयम सुटतोय, गुन्हेगारांना दिला इशारा...

जखमी झालेल्या घटनेत पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या गुंडांचा एन्काऊंटर का झाला नाही, अशी विचारणा सोशल मिडीयात झाली होती.
PCMC Police Commissioner Krishnaprakash
PCMC Police Commissioner KrishnaprakashSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : तीन आठवड्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांवर (Pimpri Police) गुडांनी दोनदा खूनी हल्ला केल्याच्या खळबळजनक घटना घडल्या आहेत. २६ डिसेंबरला पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील कोये गावात दोन सशस्त्र गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यात गुंडांना पकडताना पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Police Commissioner Krishna Prakash) हे जखमी झाले होते. तर, गुरुवारी (ता.२० जानेवारी) भरदिवसा पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ऊर्से टोलनाक्यावर गुंडांनी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिस पथकावरच मोटार घातली. त्यात एक पोलिस गंभीर जखमी झाला. निर्ढावलेल्या गुन्हेगारांच्या पोलिसांवरील वाढत्या हल्यांमुळे काहीसे टीकेचे धनी झालेले पोलिस आयुक्त यानंतर गंभीर झाले असून त्यांनी बळाचा थेट वापर करण्याचा इशारा देत आता असा हल्ला झाला, तर एन्काउंटर करण्याचेच अप्रत्यक्ष सूचित केले आहे.

PCMC Police Commissioner Krishnaprakash
पटोलेंनी सांगितलेला ‘गावगुंड मोदी’ सापडला; पण त्याला घाम फुटला!

कोये येथे थेट पोलिस आयुक्त जखमी झालेल्या घटनेत पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या गुंडांचा एन्काऊंटर का झाला नाही, अशी विचारणा सोशल मिडीयात झाली होती. त्यामुळे ती घटना चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर तीन आठवड्यांतच गुंडाशी थेट दुसरी झटापट गुरुवारी झाली. त्यात, तर शुभम कदम हा पोलिस गंभीर जखमी झाला असून त्यांचा डावा पाय खूब्यातून निखळला आहे. या घटनेतही पोलिसांनी बळाचा वापर केला नसल्याने ती कोयेसारखी पुन्हा चर्चिली जात आहे. मात्र, या टोळीकडे घातक शस्त्रे नसल्याने व त्याचा त्यांनी वापर न केल्याने पोलिसांनी गोळीबारासारखे पाऊल उचलले नसल्याचे समजते. औषधी वाहने लुटणाऱ्या या मध्यप्रदेशातील देवास येथील ११ जणांच्या दोन मोटारींपैकी एक मोटार त्यांनी बॅरिकेडस उडवून कदम यांच्या अंगावरच घातली नाही, तर त्यांना २० ते २५ फूट फरफटत नेले. तरीही गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने संयम ठेवला, हे विशेष.

याबाबत होत असलेली टीका शुक्रवारी (ता.21 जानेवारी) बोलताना कृष्णप्रकाश यांनी खोडून काढली. आम्ही कमी पडत नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, आम्ही जखमी झालो म्हणजे हरलो असेही नाही, असे ते म्हणाले. कायद्याचे पालन करून आम्ही दोन्ही ठिकाणी कारवाई केली आहे. अशा घटनांत पोलिसांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुंडाचा स्वसंरक्षणार्थ केलेल्या प्रतिकारात खात्मा तथा एन्काऊंटर का केला नाही, यासंदर्भातील त्यांनी दिलेले उत्तर हे काहीसे पटणारेही आहे. मुंबईवरील अतिरेकी हल्यात जिवंत पकडला गेलेला अजमल कसाबमुळेच या घटनेतील पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट झाला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मात्र, आता आमचा संयम सुटू शकतो, असे सांगत भविष्यात योग्य बळाचा वापर करू, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे आता मुंबई पोलिस करीत असलेल्या चकमकी होतील, असेच जणू काही थेट सूचित केले आहे.

PCMC Police Commissioner Krishnaprakash
'आभाळात वार करणाऱ्या गृहराज्यमंत्री देसाईंना जिल्ह्यात काय चाललंय हे माहितच नाही'

दरम्यान, काल पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकावर मोटार घालणाऱ्या एमपीतील लुटारू टोळीतील नऊजणांना पकडण्यात आले आहे. तर, दोघे डोंगरात पळून जाण्यास यशस्वी झाले. काल रात्रभर ही शोधमोहीम संपूर्ण गुन्हे शाखा व स्थानिक तळेगाव पोलिसांनी घेतली. ही टोळी शिळफाट्याहून पुण्याच्या दिशेने येणार असल्याची टीप गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकातील एपीआय डॉ. अशोक डोंगरेंना मिळाली होती. त्यानुसार या पथकाचे पीआय देवेंद्र चव्हाण व गुंडा स्क्वॉडचे एपीआय हरीश माने व पथकाने ऊर्से टोलनाक्यावर सापळा लावला होता. त्यावेळी या टोळीच्या दोन्ही मोटारींनी तेथील बॅरिकेडस उडवून पोलिसांच्या अंगावर एक मोटार घातली. नंतर यू टर्न घेत पुन्हा मुंबईच्या दिशेने ती निघाली होती. त्यावेळी कदम या पोलिस कर्मचाऱ्याला तिने वीस ते पंचवीस फूट फरफटत नेल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. दरम्यान, या टोळीविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणून सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com