Pune Municipal Corporation: अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीच्या निविदेसाठी राजकीय दबाव; मर्जीतील ठेकेदारासाठी खटाटोप

Pune New Fire Brigade Building: महापालिकेत पुन्हा प्रशासक काळातील निविदा प्रक्रियेतील राजकीय दबावाची चर्चा सुरू...
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे महापालिकेची लोहियानगर येथील अग्निशामक दलाची इमारत जुनी झाली आहे. ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवी इमारत बांधली जाणार असून, त्यासाठी सुमारे २२ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. या निविदेत पात्र होण्यासाठी इमारत बांधल्याचा दाखल्यांसह इतर अटी व शर्ती ठेकेदारांनी पूर्ण करणे आवश्‍यक आहे.

मात्र, त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झालेली असताना राज्यातील एका मंत्र्याच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी खटाटोप सुरू आहे. त्यामुळे प्रशासक काळातील निविदामंधील राजकीय दबावाची महापालिकेत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Pune Municipal Corporation
Sharad Pawar Statement: कर्नाटकच्या निकालामुळे आगामी निवडणुका...; शरद पवारांचं मोठं विधान

अग्निशामक दला(Fire Brigade)च्या नवीन इमारतीसाठी ५ ठेकेदारांचे प्रस्ताव आले असून, त्यांचे अ पाकीट उघडून त्यांचे कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एकवेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यासंदर्भात मंगळवारी (दि. २४) कोणता ठेकेदार पात्र, अपात्र होणार यासाठी बैठक घेतली जाणार आहे.

प्रशासनाकडे तक्रारी दाखल....

पथ विभागातर्फे शहरातील रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा काढल्या. त्यातील पॅकेज चार निविदेमध्ये नियमांचे उल्लंघन करून मर्जीतील ठेकेदार काम मिळवून देण्यासाठी माजी सभागृह नेते, आमदार, माजी नगरसेवक सक्रिय झाले होते. त्याविरोधात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्यानंतर अखेर ही निविदाच रद्द करावी लागली. पॅकेज चार प्रमाणे तीच मंडळी पुन्हा या निविदेत सक्रिय झाली असून, त्यांच्याकडून दबाव टाकला जात आहे. याविरोधात प्रशासनाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.(Latest Marathi News)

Pune Municipal Corporation
Jayant Patil Reaction On Ayodhya Visit: देवाच्या दर्शनासाठी संपूर्ण सरकार जातं हा प्रकार पहिल्यांदाच दिसतोय..

‘अंकल’च्या ठेकेदारासाठी खटाटोप

रेल्वे विभागाकडे केलेल्या कामाचे दाखले जोडले आहेत, चॅनलिंग व पुलाचा कामाचे दाखले जडले आहे, त्यामध्ये बांधकाम दिसून येत नाही. २०२०-२१ या वर्षीचे ताळेबंद जोडले नाही, त्यामुळे निविदेत पात्र ठरत नाही यासह इतर आक्षेप घेतले आहेत, तरीही ‘अंकल’च्या ठेकेदारासाठी खटाटोप सुरू आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा प्रशासक काळातील निविदा प्रक्रियेतील राजकीय दबावाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, याबाबत भाष्य करण्यास महापालिकेतील (PMC)अधिकाऱ्यांनी नकार दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com