Amitesh Kumar Porsche Car Accident : आरोपीला वाचवण्यासाठी ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न, पोलिस आयुक्तांनी दिला दुजोरा

Porsche Car Accident : पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून याची तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अपघात प्रकरणात दररोज नवीन आणि धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.
Amitesh Kumar pune car accident
Amitesh Kumar pune car accidentSarkarnama

Pune Accident News : पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या 'हिट अँड रन' अपघात प्रकरणात दररोज नवीन आणि धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. ज्या अल्पवयीन मुलाच्या गाडीने हा अपघात झाला. त्या गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः याबाबत माहिती दिली असून याची तपासणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. Amitesh Kumar Porsche Car Accident

कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांच्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने पोर्श गाडी चालवून एका दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी वरून जाणारे तरुण आणि तरुणी दोघे हवेत उडून रस्त्यावर पडले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले हे दोघेजण इंजिनियर होते.

हा अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीला तेथे असलेल्या जमावाने चोप दिला. त्यानंतर त्याला आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांच्या (Police) ताब्यात दिले. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या अल्पवयीन मुलाला या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी राजकीय दबाव टाकण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या भागातील स्थानिक आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) हेदेखील या अपघातानंतर मध्यरात्री पोलिस स्टेशनमध्ये गेल्याचे समोर आले आहे. हा अल्पवयीन आरोपी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांचा मुलगा असल्याने त्याला वाचवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amitesh Kumar pune car accident
Pune Porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या मुसक्या आवळल्या...

येरवडा पोलिस (Yerwada Police Station) स्टेशनमध्ये असताना या अल्पवयीन मुलाला पिझ्झा, बर्गर खाण्यासाठी देऊन पार्टी करण्यात आल्याचा आरोप केला जात होता. येरवडा पोलिसांनी या आरोपीला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत पायघड्या घातल्याचे प्रकार समोर आले होते. अल्पवयीन मुलाच्या शेजारी अगरवाल यांचा ड्रायव्हर बसला होता. पोलिसांना दिलेल्या पहिल्या जबाबामध्ये या ड्रायव्हरने बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांनीच या मुलाला गाडी चालू दे असे आपल्याला सांगितले होते, असे म्हंटले आहे. तर आता हा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत नव्हता तर आमचा फॅमिली ड्रायव्हर ही अपघात ग्रस्त गाडी चालवीत होता असा दावा विशाल अगरवाल आणि त्यांचे वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. Amitesh Kumar on pune car accident

या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पोलिस आयुक्तांनी विविध गोष्टींवर खुलासा केला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, प्रथमदर्शी हा अल्पवयीन मुलगा गाडी चालवीत असल्याचे समोर आले आहे. मात्र काही प्रमाणात पोलिसांकडून त्रुटी राहिल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. या गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. पोलिस स्टेशन स्तरावर काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आहेत. याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अपघात प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये कलम 201 नुसार कारवाई केली जाणार आहे.

Amitesh Kumar pune car accident
Pune Accident : बुंद से गेलेली पुणे पोलिस हौद भरून परत आणणार का? आता तपासासाठी दहा पथकं नियुक्त!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com