Pradeep Kurulkar Case Update : हनीट्रॅप प्रकरणी अटकेत असलेले कुरूलकरची आज सुनावणी; काय होणार?

Pradeep Kurulkar Case Update : जामीन मिळणार का?
Pradeep Kurulkar Case Update :
Pradeep Kurulkar Case Update :Sarkarnama

Pradip Kurulkar Court Hearing : हनीट्रॅप प्रकरणी अटक झालेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्या प्रकरणात आज पुण्यातील न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागे झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने करूलकरांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ दिली होती.महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) ३ मे रोजी प्रदीप कुरुलकरला उचलले होते. कुरूलकरवर पाकीस्तानी एजंटला संवेदनशील माहिती दिल्याचा आरोप आहे. (Pradeep Kurulkar Case Update)

Pradeep Kurulkar Case Update :
Mantralay News : सत्तांतरानंतर मंत्रालयातील गर्दीत मोठी वाढ ; व्यवस्थेवर ताण, प्रशासन 'हा' मोठा निर्णय घेणार..

कुरूलकर याची औषधांची मागणी -

कुरूलकरला 16 मे रोजी न्यायालयात आणण्यात आले आहे. न्यायालयीन सुनावणी दरम्यान कुरुलकर म्हणाला की, 'मला उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेची व्याधी आहे.' तसेच, कुरूलकने न्यायालयाकडे औषधं आणि घरचं जेवण देण्याची मागणी केली होती. औषधांसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र घरचं जेवणासाठी परवानगी देण्यात आली नाही..

कुरूलकरावर नेमके काय आरोप?

एटीएसच्या (ATS News) माहितीनुसार, शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर हे व्हॉट्सअॅप, व्हिडिओ कॉल, मॅसेजसद्वारे शत्रूराष्ट्र पाकिस्तानला भारतीय संरक्षणाबाबतची अत्यंत संवेदनशील असलेली माहिती पुरवली आहे. ते पाकीस्तानी एजंटच्या संपर्कात असल्याचा दावा एटीएसने केला आहे. हा हनीट्रॅपचा प्रकारातून त्यांनी हे देशद्रोही प्रकारचे कृत्य केले आहे.

Pradeep Kurulkar Case Update :
Pune News : मोठी कारवाई! पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्याला अटक

पदाचा गैरवापर केला -

कुरलकरनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचं एटीएसने आरोप केला आहे. शत्रूराष्ट्राने आपल्या देशाची संरक्षणाबाबतची संवेदनशील माहिती पकडली तर ते राष्ट्राला धोकादायक ठरू शकते. याची पुर्ण कल्पना असताना ही कुरूलकरने देशद्रोही कृत्य केले. कुरुलकर विरोधात बुधवारी आयपीसी कलम 1923 आणि इतरही काही कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com