Pune: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar), एल्गार परिषदेच्या आयोजक हर्षाली पोतदार आणि पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी (Koregaon Bhima Violence) चौकशी आयोगाने समन्स बजावले आहे. आज त्यांची उलटतपासणी होणार आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे कामकाज आज पुण्यात चालणार आहे. आज अकरा वाजता प्रकाश आंबेडकर आयोगासमोर साक्ष देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. (Latest News Pune)
कोरेगाव भीमा येथे २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत पुराव्यांच्या नोंदीसाठी ही आयोगाची शेवटची सुनावणी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणतीही स्थगिती दिली जाणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
हिंसाचार झाल्यानंतर आंबेडकर यांनी विविध आरोप केले होते. पोतदार या एल्गार परिषदेच्या आयोजकांपैकी एक होत्या, तर हिंसाचार झाला तेव्हा ज्योती कदम या हवेलीच्या उपविभागीय अधिकारी होत्या. त्यामुळे आयोग तिघांची उलटतपासणी घेणार आहे.
विविध राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, भीमा कोरेगाव परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सदस्य तसेच इतर अशा विविध लोकांच्या साक्षी तसेच उलटतपासणी घेण्याचे काम आयोगाकडून सुरू आहे.
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराची चौकशी सुरू आहे. त्यासाठी दोन सदस्यीय आयोग स्थापन करण्यात आला आहे. निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक हे या आयोगाचे सदस्य आहेत. आयोगाकडून पुणे आणि मुंबई येथे उलटतपासणी घेण्याचे काम सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.