
Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत (University Election) विद्यापीठ विकास मंचने दहापैकी नऊ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे तुलत बंधु प्रसेनजीत फडणवीस चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत.
पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी नोंदणीकृत पदवीधर गटाच्या निवडणुकीत विद्यापीठ विकास मंचने दहापैकी नऊ जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीचा केवळ एक उमेदवार निवडून येऊ शकला. विकास मंचचे उमेदवार असलेले प्रसेनजीत फडणवीस (Prasenjit Fadnavis) यांनीही दणदणीत विजय मिळवला. त्यांना ४ हजार ४४७ मते मिळाली आहेत. खुल्या गटामध्ये त्यांना सर्वाधिक मते मिळवली आहेत.
दरम्यान, विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीमध्ये २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रसेनजीत फडणवीस काठावर पास झाले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हा विजय जिव्हारी लागला होता. निवडणुकीत चांगल्या मतांनी विजय मिळविलेल्या प्रसेनजीत फडणवीस यांच्यासाठी यावेळी पुरेशी काळजी घेण्यात आली. गेल्यावेळी झालेल्या अधिसभा निवडणुकीत फडणवीस यांना दगाफटका झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे बंधु असूनदेखील त्यांना काठावर पास झाल्यासारखे निवडून आले होते. परिणामी यावेळी त्यांच्यासाठी विद्यापीठ विकास मंचने विशेष काळजी घेतली.
या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP), शिवसेना हे तीन पक्ष मैदानात उतरले. भाजप तसेच राष्ट्रीय सवयंसेवक संघाशी संबंधित शिक्षण संस्थाच्या विद्यापीठ विकास मंचने सुरूवातीपासूनच जय्यत तयारी केल्याने त्यांना यश मिळविता आले. विद्यापीठाच्या राजकारणात तरबेज असलेल्या विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीची तयारी आधीपासूनच केली. नियोजनबद्धपणे केलेल्या कामाचे फळ त्यांना मिळाले. वैचारिक जवळीक नसलेल्या अनेक संस्थांनीदेखील विद्यापीठाच्या राजकारणात विद्यापीठ विकास मंचला मदत केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.