Hemant Rasane's New Banner in Pune : कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या हेमंत रासनेंचा दारुण पराभव करत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे 'जायंट किलर' ठरले. या विजयाने आघाडीला मोठं बळ मिळालं. तर पारंपारिक मतदारसंघ असून आणि दिग्गज नेत्यांची मोठी फौज उभी करुनही कसब्यात पदरात पडलेला पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. पण आता भाजपच्या रासनेंनी थेट २०२४ ची जोरदार तयारी सुरु केल्याचं समोर आलं आहे.
भाजपचे कसब्यातील उमेदवार हेमंत रासने(Hemant Rasane) यांचे कसबा परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर झळकले आहेत. त्यांच्याकडून आतापासूनच कसब्यात जनसंपर्क कार्यालय उघडण्याची घोषणा करण्यात आली आहे. या बॅनरवर त्यांनी पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ नाशवंत नाही या आशयाद्वारे आघाडीच्या धंगेकरांना एकप्रकारे इशारा देतानाच २०२४ च्या निवडणुकीत ताकदीनं उतरण्याचे संकेतही रासनेंनी दिले आहेत. त्यामुळे कसबा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी ‘पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही’ अशी बॅनरबाजी तर केली आहेच. मात्र त्याचबरोबर आता कसब्यातील प्रत्येक विभागात जनसंपर्क कार्यालयही उघडणार असल्याचेही त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. 2024 च्या निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी हेमंत रासने यांच्या या बॅनरबाजीमुळे कसबा मतदार संघाकडे आता साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
धंगेकर - रासनेंमध्ये रंगलं शाब्दिक युध्द
भाजपच्या हेमंत रासनेंनी धंगेकर यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर देताना रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपलं अभिनंदन ! आपण देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले. आपण ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी बोलताना तारतम्य बाळगा देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत असे खडेबोल धंगेकरांना सुनावले होते.
धंगेकरांचा रासनेंवर पलटवार
रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. धंगेकर म्हणाले, हेमंत रासने मोठा माणूस आहे, त्याच्याबद्दल काय बोलणार. मी फडणवीसांना काहीच बोललो नाही. मी काही एवढा मोठा नाही पण फक्त एक कार्यकर्ता म्हणून विनंती केली. मात्र, मी देखील पाचवेळा महापालिकेत निवडणून आलोय. तीन विधानसभा निवडणूका लढवल्यात. त्यामुळे रासनेंपेक्षा माझा कार्यकाळ मोठा आहे. रासने यांनी एकदा तो तपासून घ्यावा असं प्रत्युत्तर धंगेकर यांनी रासनेंवर पलटवार केला
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.