Sharad Pawar On Modi : पंतप्रधान मोदींनी माझा फोनही घेतला आणि 'ते' निमंत्रणही स्वीकारलंय; पण...'' शरद पवारांचं मोठं विधान

Political News : '' केंद्रानं विधीमंडळ आणि संसदेत महिलांना आरक्षण द्यायला पाहिजे...''
Sharad Pawar, PM Narendra Modi
Sharad Pawar, PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नऊ वर्षांच्या सत्ताकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत कधीच कठोर भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. मात्र, त्यांनी नुकताच भाजपच्या एका कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल करतानाच 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोपही केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींच्या टीकेवर भाष्य करतानाच मोठा खुलासा केला आहे.

शरद पवारां(Sharad Pawar)नी गुरुवारी पुण्यात (दि.२९) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हांला गुरु समजतात. आत्तापर्यंत त्यांची तुमच्याबाबतची वक्तव्यं ही आदरार्थी असायची. पण एकदम अचानक ९ वर्षांनंतर असं काय घडलं की, तुमच्यावर त्यांनी थेट हल्लाबोल केला आहे. यात वैयक्तिक काही आहे की राजकीय ? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला प्रत्युत्तर देताना शरद पवार म्हणाले, आमचं व्यक्तिगत असं काही नाही. काही दिवसांपूर्वीच एका गोष्टीसाठी मी पंतप्रधान मोदींना कॉल केला होता.

Sharad Pawar, PM Narendra Modi
Maharashtra Politic's : एखाद्याने विकेट दिली तर, ती घेतलीच पाहिजे ; पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा षटकार

रोहित टिळक(Rohit Tilak) माझ्याकडे आले होते. १ ऑगस्टला दरवर्षी लोकमान्य टिळकांच्या पुरस्काराचा पुण्यात कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींना बोलावून त्यांना पुरस्कार द्यायचा ही त्यांच्या कमिटीची इच्छा होती. पण त्यांच्यात थेट जवळीकता नव्हती. म्हणून मी त्यांना म्हटलं की, मी फोन करतो. आणि त्यांना विनंती केली होती. त्यांनी ती विनंती देखील स्वीकारली. आणि ते १ ऑगस्टला पुण्यात येणार देखील आहे. म्हणजे काल त्यांनी जे मुद्दे घेतले आहे. त्यामुळे त्यात काही बदल झाला असेल तर मला माहीत नाही. पण त्यांनी त्यावेळी तरी माझं निमंत्रण स्वीकारलं असून ते पुण्यात येणार आहे असंही पवार यावेळी म्हणाले.

पवारांची 'ही' मोठी मागणी...

महाराष्ट्रात मी मुख्यमंत्री असताना महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले होते. त्यात जिल्हा परिषद,नगर पंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका या संस्थांमध्ये आरक्षण दिलं. आणि त्याचा परिणाम अनेक संस्थांमध्ये महिलावर्ग चांगलं काम करत आहेत. आता हा अनुभव बघितल्यावर त्याचा निर्णय राष्ट्रीय पातळीवर घेतला गेला, त्याचं आम्ही स्वागत केलं. आम्ही महिलांना फक्त महापालिकेपर्यंतच आरक्षण देऊ शकलो. पण आता विधीमंडळ आणि संसद या दोन्ही ठिकाणी महिलांना आरक्षण द्यायला हवं अशी मोठी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

Sharad Pawar, PM Narendra Modi
Devendra Fadnavis On Sharad Pawar : '' पवारांनी मला नाहीतर त्यांच्या पुतण्यालाच 'क्लिन बोल्ड' केलंय ; पण...''; फडणवीसांचा तिखट पलटवार

पवार म्हणाले, केंद्रानं विधीमंडळ आणि संसदेत महिलांना आरक्षण द्यायला पाहिजे. आणि यात जर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) पुढाकार घेणार असतील तर आमचं संसदेतलं संख्या मर्यादित आहे. तरी मोदींच्या या धोरणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठिंबा देईल असंही पवार यांनी यावेळी सांगितलं. याचवेळी त्यांनी महिलांना विधीमंडळ आणि संसदेत आरक्षण देण्याबाबत जे काही विरोधी पक्ष आहे, त्यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केलेली नाही. पण त्यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. आणि ते यात कसे सहभागी होतील हे पाहू असेही पवार यांनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते...?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांची लिस्ट मोठी आहे, भाजपच्या कार्यकर्त्यानी यांच्या घोटाळ्याचा मीटर बनवावा असं मोदी म्हणाले होते. तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा. मात्र तुम्हाला जर तुमच्या मुला-मुलींचं आणि नातवंडांचं भलं करायचं असेल तर तुम्ही भाजपाला मतदान करा, असेही मोदी म्हणाले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com