Narendra Modi News : नरेंद्र मोदींनी घेतली माजी आमदार लेले कुटुंबीयांची भेट

PM Modi Inaugurate Pune Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. अरविंद लेले यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन आठवणींना उजाळा दिला. लेले कुटुंबीयांनी 'हिंदू सारा एक' या गीताची फ्रेम मोदींना भेट दिली. तर पीएम केअर फंडासाठी दोन लाख रुपयांचे समर्पण दिले.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांचा शिवाजीनगर पोलीस ग्राउंड येथील कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी लेले कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी अनुराधा लेले, मिलिंद लेले, प्रमोद लेले, शहर भाजपचे सहप्रचार प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, सुवर्ण लेले, अंजली लेले उपस्थित होते. डॉ. अरविंद लेले हे १९७८ ते १९८० कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.

Narendra Modi
Jalgaon Politics : जळगाव महापालिकेच्या आयुक्तांचा बदलीसाठी अर्ज अन् अविश्वास प्रस्ताव स्थगित

हेमंत लेले म्हणाले, ''आम्ही बाबांचा 'कृतार्थ' हा चरित्र ग्रंत प्रकाशित केला. तो मोदींना द्यावा अशी माझ्या आईची इच्छा होती. त्यासाठी आज वेळ दिल्याने मोदींसारख्या तेजस्वी पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा पूर्ण झाली. यावेळी मोदीजींनी माझ्या आईसह सर्वांची वैयक्तीक चौकशी केली. मोदी आणि माझे वडील यांचे चांगले संबंध होते. या भेटीत त्यांनी दोघांच्या स्नेहाच्या संबंधांना उजाळा दिला. संपूर्ण समर्पण भावाने भाजपचे (BJP) काम कर. आपले विचार, तत्त्वांपासून फारकत घेऊन नको, असे त्यांनी सांगितले. आजचा दिवस आमच्यासाठी सोन्याचा वर्षाव करणारा ठरला.''

Narendra Modi
Ahmednagar Politics: कर्जत-जामखेड एमआयडीसी मागणीचे पडसाद थेट मोदींच्या दौऱ्यात; युवकांनी फलक झळकावले

जुलै २०२३ ते जुलै २०२४ हे गीता धर्म मंडळाचे शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमास पंतप्रधानांनी उपस्थित राहावे असे निमंत्रण आजच्या दौऱ्यात भेट घेऊन देण्यात आले. मंडळाच्या कार्यवाह विनया मेहेंदळे, सह कार्यवाह मुकुंद कोंढवेकर यांनी आज याचे पत्र मोदी यांना दिले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com