Pune Accident: पुतण्यानं दोघांना चिरडल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार मोहिते म्हणाले, 'माझा पुतण्या पळून गेला...'

NCP MLA Dilip Mohite Patil Nephew mayur mohite crushed young boy om bhalerao: मी या अपघाताचे समर्थन करीत नाही. कुठलाही राजकीय हस्तक्षेप करणार नाही," असे मोहिते पाटलांनी स्पष्ट केले.
Pune Accident
Pune AccidentSarkarnama
Published on
Updated on

पोर्शे कारच्या दुर्घटना पुण्यात (Pune Accident) ताजी असताना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite Patil) यांच्या पुतण्याने सुसाट गाडी चालवत दोघांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अपघातानंतर मयुर मोहिते घटनास्थळावरुन पळून गेल्याची टिका होत आहे. या अपघातातील दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

"अपघातानंतर माझा पुतण्या पळून गेला नाही, त्याने मद्यपानही केलं नव्हते, असा दावा आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे. मयूर सध्या पोलिसांच्या ताब्यात असल्याचे त्यांनी सांगितले. हा अपघात कसा झाला, त्याचा तपास पोलिस करीत आहे.

झालेली घटना दुर्देवी आहे. राजकीय व्यक्तीचा पुतण्या असल्यामुळे त्यात राजकारण आणण्याची शक्यता आहे. मी या अपघाताचे समर्थन करीत नाही. कुठलाही राजकीय हस्तक्षेप करणार नाही," असे मोहिते पाटलांनी स्पष्ट केले.

अपघातग्रस्तांनी मयूरने दवाखान्यात नेले, अपघातानंतर त्यांचा मला फोन आला मी त्याला पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले. तो काल रात्रीपासून पोलिसांच्या ताब्यात आहे. माझा पुतण्या कधीही मद्यपान करीत नाही, तो अभियंता असून उद्योजक आहे.

पोलिस तपासात जी माहिती समोर येईल, जी कारवाई करतील ती मला मान्य आहे. मृतांच्या नातेवाईकांना भेटायला जाणार असल्याचे दिलीप मोहिते यांनी साम टिव्हीशी बोलताना सांगितले.

Pune Accident
BJP Core Committee Meeting : भाजपला हव्यात 170 जागा; विधानसभेसाठी कोअर कमिटीत खलबतं

ओम भालेराव (वय 19 वर्ष ) असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. अपघातानंतर मयूर मोहिते कारमध्येच बसून होता. अपघाताची माहिती मिळताच दुचाकीस्वाराच्या युवकाच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात मयूरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर मंचर पोलिस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण होते. मयूर याची फॉर्च्यूनर कार विरुद्ध दिशेनं जात होती. कारनं समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात ओमचा जागीच मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com