Pune News: मोदींमुळे पुण्यातील विमानांचे 'उड्डाण' रखडले; काँग्रेस आंदोलनाच्या पवित्र्यात

Congress Politics: टर्मिनल लवकरात लवकर सुरू करा...
Pune News
Pune NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे विमानतळाच्या टर्मिनलचे काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटून गेले आहेत. मात्र हे टर्मिनल सुरू होत नसल्याने त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागत आहे. हे टर्मिनल लवकरात लवकर सुरू करावे, यासाठी काँग्रेसच्या वतीने विमानतळ प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले होते. विमानतळ प्रशासनाने हे टर्मिनल सुरू न केल्यास प्रवाशांच्या हितासाठी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा थेट काँग्रेसने दिला होता. या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना पुण्यातील उद्घाटनाची घोषणा करावी लागली, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.

पुणे विमानतळावरून दररोज मोठ्या प्रमाणात विमानांचे उड्डाण होते. विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने विमानतळावर गर्दी होते. प्रवाशांची गरज लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाने नवीन टर्मिनल उभारले आहे. या टर्मिनलचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र उद्घाटन न झाल्याने हे वापरता येत नाही. परिणामी प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. नव्याने बांधण्यात आलेल्या या टर्मिनल चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. मात्र यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून वेळच दिली जात नसल्याने हे उद्घाटन रखडले आहे. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांची उद्घाटनासाठी वेळ घेण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रयत्न यशस्वी झालेला नाही. काम पूर्ण होऊ नये केवळ उद्घाटन न झाल्याने टर्मिनल खुले झालेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विमानतळावर प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन तातडीने हे टर्मिनल खुले करावे, अशी मागणी काँग्रेसने केली होती. यासाठी काँग्रेसच्या वतीने गेल्या महिन्यात डिसेंबर 2023 मध्ये विमानतळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली होती. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि विमानतळ संचालक यांना निवेदने देण्यात आली होती. जानेवारीपूर्वी विमानतळ टर्मिनल सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होता. विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चर्चा करून त्यांच्या समस्या ही जाणून घेण्यात आल्या होत्या. हे टर्मिनल तातडीने खुले न झाल्यास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मोठे आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.

काँग्रेस पक्षाने दिलेल्या इशाऱ्यानंतर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना पुण्यात येऊन लवकरच टर्मिनल चे उद्घाटन होईल अशी घोषणा करावी लागली आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाने पुणेकरांच्या आर्थिक, औद्योगिक घटकांशी संबंधित टर्मिनल कार्यान्वित होण्याची गरज मांडली. पुणेकरांचा दबाव निर्माण केला. यामुळेच या लढ्याला यश आले आहे. यापुढील काळातही पुणेकरांच्या हितासाठी काँग्रेस तत्पर राहील असेही जोशी यांनी स्पष्ट केले.

Edited by: Mangesh Mahale

Pune News
Shiv Sena Politics: ठाकरे गटाच्या अधिवेशनातील बॅनरमधून अद्वय हिरे गायब!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com