Pune BJP In-Charge : पुणे भाजपाची निवडणुकांची तयारी; शहराच्या प्रभारीपदी माजी खासदार साबळेंची नियुक्ती

Amar Sable News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाकरी फिरवली
Amar Sable
Amar SableSarkarnama

Amar Sable In-Charge of Pune BJP : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या प्रभारीपदी माजी खासदार अमर साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाच्या शहराध्यक्ष आणि प्रभारींची नेमणूक सध्या सुरू आहे. पुण्याच्या शहराध्यक्ष बदलाची चर्चादेखील सुरू आहे. येत्या काही दिवसात नव्या शहराध्यक्षांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. साबळे हे राज्यसभेचे माजी माजी खासदार आहेत. पक्षाचे जुने कार्यकर्ते आहेत. पुण्यासारख्या महत्वाच्या शहरात साबळे यांची नेमणूक महत्वपूर्ण मानली जात आहे.

कसबा विधानसभा (Pune) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा दारून पराभव झाला आहे. यापूर्वी धीरज घाटे व त्याआधी आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांच्याकडे पुण्याची जबाबदारी होती. यावेळी करण्यात आलेल्या नेमणुकांमध्ये बदल करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांची संबंधित शहर किंवा जिल्हाबाहेर नेमणूक करण्यात आली आहे. येत्या काळात महापालिकेची निवडणूक आहे. लोकसभा व त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकांची तयारी पक्षाकडून सुरू आहे.

Amar Sable
BJP Appointed District Incharge : पुणे शहर-पिंपरी अन् जिल्ह्यात भाजपचे तब्बल तीन प्रभारी; साबळे, पांडे आणि डहाळेंकडे जबाबदारी

२०१७ ते २०२२ या काळात भारतीय जनता पार्टीची (BJP) पुणे महापालिकेत सत्ता होती. तब्बल शंभर नगरसेवक होते. तरीही या काळातील भाजपाची कामगिरी फारशी समाधानकारक राहिली नाही. गेले वर्षभर महापालिकेत प्रशासकराज आहे. परिणामी पक्षाची संघटना काहीशी संथ झाली आहे. कसबा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर भाजपाच्या संघटनेने एकप्रकारे आत्मविश्‍वास गमावला आहे. आता पराभवातून नव्या विजयाकडे वाटचाल करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. माजी खासदार साबळे यांच्या नियुक्तीने निवडणुकांच्या तयारीला वेग येणार आहे.

Amar Sable
K. Chandrasekhar Rao : मोठी बातमी : के. चंद्रशेखर राव महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढणार...'या' दोन मतदारसंघांचा विचार सुरु

यापुढचा काळ पुण्यात भाजपाला (Pune BJP) फार सोपा नाही. कसब्याच्या निकालाने ते दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणूक हे पक्षाला लगेच येणारे आव्हान आहे. लोकसभेची निवडणूक होणार की नाही अशी चर्चा सध्या जोरात आहे. निवडणूक लागलीच तर त्याची तयारी पक्षाला करावी लागणार आहे. उमेदवार कुणीही असला तरी संघटना म्हणून तयारी करावी लागणार आहे. पक्षाची संघटना मजबूत असल्याचे नेते कितीही सांगत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. परिणामी पक्षासाठी आगामी लोकसभा विधानसभा आणि महापालिका निवडणुका (Election) तितक्या सोप्या नाहीत हे निश्‍चित.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com