Pune Crime News : लग्नाच्या वाढदिवसालाच कुख्यात गुंड शरद मोहोळचा 'गेम'; गोळीबारात मृत्यू

Sharad Mohol death: त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी चार गोळ्या झाडल्या होत्या.
 Sharad Mohol
Sharad Mohol Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील कोथरुडमध्ये दुपारी झालेल्या गोळीबारात गुंड शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी त्याच्यावर अज्ञान व्यक्तींनी चार गोळ्या झाडल्या होत्या. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मोहोळ याचा आज लग्नाचा वाढदिवस होता.

कोथरूड परिसरात आज (शुक्रवार) शरद मोहोळवर दुचाकीवर आलेल्या तीन ते चार जणांनी गोळीबार केला. गोळीबार करून हल्लेखोर फरार झाले आहेत. पुण्यातील गँगवार प्रकरणातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शरद हिरामण मोहोळ (वय ४०, रा. माऊलीनगर, सुतारदरा, कोथरूड) याच्या विरोधात पुणे शहर, पिंपरी तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.

 Sharad Mohol
Sangli News: चंद्रहार पाटील 'वंचित' कडून? काँग्रेसच्या विशाल पाटलांचे काय होणार?

शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून (Murder) केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या गुन्ह्यात न्यायालयाने शरद मोहोळ याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay high court) मोहोळला जामीन मंजूर केला होता.

हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी शरद मोहोळला लागली होती, अशी माहिती पोलिस सुत्रांनी दिली. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड येथील सुतारदरा परिसरात ही घटना घडली. या हल्ल्यात मोहोळ गंभीर जखमी झाला होता , त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

दासवे येथील सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. येरवडा कारागृहात असताना कतील सिद्दीकीचा त्याने खून केला होता. या खटल्यातून त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतरही त्याची गुन्हेगारी विश्वात तो सक्रीय होता. जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com