Chandni Chowk Inauguration : पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार ; गडकरींची मोठी घोषणा, 'स्काय वॉक बस' आणणार

Nitin Gardkari News : चांदणी चौकाचे काम करताना अनेक अडचणी आल्या.
Chandni Chowk Inauguration
Chandni Chowk Inauguration Sarkarnama
Published on
Updated on

Pune : पु्ण्याच्या वाहतूक कोंडीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी चिंता व्यक्त करीत ही कोंडी संपविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. वाहनाची संख्या प्रचंड वाढत असल्याने कोंडी वाढत आहे. पुण्यातील प्रदूषण खूप वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात आता गर्दी वाढवू नका," असे सांगत गडकरींनी पुण्यात 'स्काय वॉक बस' आणणार असल्याचे सांगितले. 'स्काय वॉक बस' मधून अडीचशे जण प्रवास करु शकतील," असे गडकरी म्हणाले.

Chandni Chowk Inauguration
Chandni Chowk Inauguration : 'चांदणी चौका' वरून 'लेटर बॉम्ब' टाकणाऱ्या मेधा कुलकर्णींचे नाराजीनाट्य संपले ?

पुण्यातील चांदणी चौकातील पुलाचे उद्धघाटन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

"चांदणी चौकाचे काम करताना अनेक अडचणी आल्या. त्यावर मात करून हा पूल बांधण्यात आला. नवे तंत्रज्ञान वापरून मोठे अडथळे पार करुन या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या पुलासाठी भूसंपादनाचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले, पुण्यात ४० हजार कोटींची कामे पूर्ण करु, " असे गडकरी म्हणाले. बंगळुरुमध्ये २३ हजार कोटींचा रिंगरोड बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Chandni Chowk Inauguration
Chandni Chowk Inauguration : गडकरींच्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची हजेरी, मात्र मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीने रंगली `कोल्ड वॉर`ची चर्चा

फडणवीस म्हणाले, "पुण्याबाबत निर्णय घेताना दमछाक होते. कारण पुणे हे बुद्धिवंतांचे शहर म्हणून ओळखले जाते. विकासकामाच्या कुठल्याही एका प्रस्तावावर पुणेकरांचे समाधान होत नाही. एक प्रस्ताव आला ती दुसऱ्या देशातील आणखी प्रस्ताव येतो. मग आणखी नवे प्रस्ताव येतात,"

पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी डबल डेकर पूल तयार करण्याचा प्लॅन नितीन गडकरी यांनी तयार केला आहे. यामुळे पुणे शहर वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com