CNG
CNGsarkarnama

CNGचा पुण्यात 'भडका' महिनाभरात दोन वेळा दरवाढ

आता पुणेकरांना (PUNE)आता 'सीएनजी'च्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरवाढीचाही दणका बसला आहे. सीएनजीचा (CNG) वापर करीत असलेल्या अनेक वाहनधारकांना यामुळे आर्थिक झटका बसला आहे.
Published on

पुणे : दिवाळीत पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला होता. हा दिलास अद्याप कायम असून त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले नाहीत. मात्र आता सीएनजीचा (CNG) भडका होत असल्याचे दिसते.

काही दिवसापासून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सामना केल्यानंतर आता पुणेकरांना (PUNE)आता 'सीएनजी'च्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरवाढीचाही दणका बसला आहे. सीएनजीचा (CNG) वापर करीत असलेल्या अनेक वाहनधारकांना यामुळे आर्थिक झटका बसला आहे. गुरुपासून सीएनजी एक रुपये 80 पैशांनी महागले आहे. त्यामुळे आता शहरात एक किलो सीएनजीसाठी ६३. ९० रुपये मोजावे लागणार आहे.

गुरुवारी सीएनजी 1.80 रुपयांनी महागले. मार्च 2020 पूर्वी तीन ते चार महिन्यांतून एकदा सीएनजीच्या दरात वाढ होत. ही वाढ जास्तीत जास्त एक रुपयांपर्यंत असायची. मात्र आता दर महिन्याला दरवाढ होत असून ती दोन रुपयांच्या पुढे देखील जात असल्याचे यातून स्पष्ट होते.

CNG
पडळकरांच्या जिवाला धोका ; सुरक्षा देण्यासाठी फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

गेल्या महिन्यात दोनदा दरवाढ होऊन सीएनजी प्रतिकिलो ४.०६ रुपयांनी महागले होते. चार आणि १४ आॅक्टोंबर रोजी अनुक्रमे दोन आणि २.६ रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. एका महिन्यात दोन वेळा चार रुपयांनी दरवाढ झाल्याची ही पहिलीच घटना आहे.

असे आहेत १८ नोव्हेंबरचे दर :

पेट्रोल - 109.50

पॉवर पेट्रोल - 113.50

डिझेल - 92.50

सीएनजी - 63.90 (प्रतिकिलो)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com