Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण?

Court issue arrest warrant against Manoj Jarange : जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्यातील सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. नाट्यनिर्मात्याची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी झालेल्या सुनावणीला हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात वॉरंट काढले आहे. हे प्रकरण 10-12 वर्षे जुने असल्याचे पुढे आले आहे.

मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्यावर नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला जरांगे हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. आता ते न्यायालयाच्या आदेशाला ते काय उत्तर देणार, याकडे राज्याचे लक्ष आहे.

प्रकरण 2013 मधील

जरांगे पाटील यांनी नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे दिले नाहीत, असा आरोप आहे. त्या प्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याची तक्रार कोथरूड पोलिस ठाण्यात 2013 मध्ये केलेली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर जरांगे झालेल्या सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते.

Manoj Jarange Patil
Maharashtra BJP : पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच? बावनकुळेंच्या विधानानं महायुतीचं राजकारण तापणार

न्यायालयाच्या समन्सनंतर जरांगे एकदा कोर्टात हजर झाले होते. मात्र पुढच्या तारखांना ते गैरहजर राहिले. त्यामुळे पुणे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील आता सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जरांगेंच्या या मागणीला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. त्यातच वंचितचे प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar हे आरक्षण बचाव यात्रा काढणार आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar Letter To Sharad Pawar : आंबेडकरांनी पवारांना धाडलं पत्र; आरक्षण बचावासाठी केलं मोठं आवाहन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com