Pune Crime News : रितेश कुमार यांची धडक कारवाई सुरूच; राजन लावंडसह टोळीतील पाचजणांवर मोका..

Ritesh Kumar On Mocca News : रितेश कुमार यांनी मोक्कानानुसार केलेली ही आतापर्यंतची बावीसावी कारवाई आहे.
Ritesh kumar Rajan lavanda
Ritesh kumar Rajan lavandaSarkarnama

Pune News: पुण्यात हडपसर परिसरात दहशत माजवून लुटमार करणाऱ्या सराईत गुंड राजन लावंड यांच्यासह पाच साथीदारांविरूद्ध मोक्कानुसार सोमवारी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्कानानुसार केलेली ही आतापर्यंतची बावीसावी कारवाई आहे.

पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोठया प्रमाणात शहरात मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या गेल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत धडक कारवाई केली.

Ritesh kumar Rajan lavanda
Vishal Phate Fraud Case in Pune : पुण्यात विशाल फटेचा नवा अवतार; १६ कोटींच्या फसवणूकप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल !

राजन रघुनाथ लावंड (वय २१) (टोळीप्रमुख), ओम ऊर्फ पिंटू विनोद भंडारी (वय २२), ऋषिकेश ऊर्फ मेघराज प्रवीण शितोळे (वय १९), रोशन हनुमंत सोनकांबळे (वय २१) आणि सागर शिवाजी घायतडक (वय १९, सर्वजण रा. माळवाडी, हडपसर) यांच्याविरुध्द मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आरोपी लावंड यांच्या विरोधात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत

हडपसर परिसरात अपहरण, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत विनयभंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या राजन लावंड टोळीतील पाच जणांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. वारंवार कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती असे पोलिसांच्या निर्देशनास आले.त्यामुळे याप्रकरणी संबंधित टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई सुरु केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत घायतडक यांच्या खुनाचा राग मनात धरून राजन लावंड आणि त्याच्या साथीदारांनी एकाला मारहाण केली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी राजन लावंड टोळीतील पाच जणांना अटक केली होती.

Ritesh kumar Rajan lavanda
Maratha Reservation : मराठा आरक्षणाची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता राज्य सरकारचा मोठा निर्णय

दरम्यान, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी टोळीप्रमुख राजन लावंड याला दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. परंतु त्याने वारंवार गंभीर गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी पोलिस उपायुक्त यांच्यामार्फत या लावंड टोळीविरुद्ध मोकाचा प्रस्ताव पाठवला होता. अतिरिक्त आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी मोकाच्या कारवाईस मान्यता दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com