Uddhav Thackeray : पुणे ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारची काढली लक्तरे !

Pune Drugs Case : ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरण समोर आले होते. याचे पुढे काय झालं असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित करत पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज उपलब्ध होतात. हे प्रकार सर्रासपणे समोर येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून पोलिसांचा कोणताही धाक..
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar and Uddhav Thackeray
Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar and Uddhav ThackeraySarkarnama

Pune News : पुणे शहरातील हॉटेल, पब मध्ये सर्रासपणे ड्रग्ज मिळत असल्याचे प्रकार समोर आल्यानंतर पुण्याचे नाव देशात चांगलेच चर्चेत आले आहे. पुणे ड्रग्ज प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे लक्तरे काढत कडक शब्दात वाभाडे काढले. या प्रकरणी पोलिस कमिशनरांवर कारवाई करून या अधिकाऱ्यांना धडा शिकविला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून ड्रग्जची प्रकरणे वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यमान राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. विधानभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभाराचे वाभाडे काढले.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar and Uddhav Thackeray
Video Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरे म्हणाले, 'ना ना करते...'

पुण्यात काही दिवसांपूर्वी ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरण समोर आले होते. याचे पुढे काय झालं असा प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित करत पुण्यात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज उपलब्ध होत असल्याच्या प्रकरणावरून नाराजी व्यक्त केली. हे प्रकार सर्रासपणे समोर येत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली असून पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नसल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. हे असे प्रकार घडत असतील तर अशा अधिकाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे, पुणे पोलिस कमिशनरांवर कारवाई केली पाहिजे, असे ते म्हणाले.

Devendra Fadanvis, Eknath Shinde, Ajit Pawar and Uddhav Thackeray
Uddhav Thackeray on MLC Election : ठाकरेंचं गणित पक्कं; विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे आमदार फोडणार?

विधानसभा अधिवेशनासाठी सभागृहात जाताना उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकाच लिफ्टमधून गेले. त्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली होती. यावर देखील आपल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी भाष्य केले. ती अगदी अचानक झालेली भेट होती. त्यामधून इतर कोणतेही अर्थ काढण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सत्ताधारी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारच्या धोरणांवर देखील ठाकरे यांनी टीका करत शेतकरी, सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com