Pune News : पती-पत्नीसाठी आभाळ ठेगणं! कांदे काढता-काढता नशीब उजळलं; दोघेही झाले पोलीस

Police Bharati : कांदे काढणारे हात आता कायद्याचे रक्षण करणार...
Police Bharati
Police BharatiSarkarnama

Pune News : शिरूर तालुक्यातील नवरा बायकोच्या जोडप्याने पोलीस भरतीची परीक्षा पास केली आहे. शेतात कांदा काढणी करत असताना शेवटची मेरिट लिस्ट लागली आणि नवरा बायको दोघांचीही पोलीस भरतीत निवड झाली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चार वर्षापासून तुषार शेलार हे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होते. पुरेसे प्रयत्न करूनही नशीब साथ देत नव्हते. अखेर प्रयत्न चालू ठेवत शेतीतील कामात मन रमविले. दोन-अडीच वर्षांपासून पत्नीची साथ आणि सक्रिय सहभाग मिळत गेला. पत्नीनेही त्याच्याबरोबर पोलीस भरतीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर आता अर्धांगिनी असलेल्या भाग्यश्री शेलार हिच्या सर्वतोपरी सहकार्याने तुषार शेलार याचेही भाग्य उजाळले. अन् पती-पत्नी दोघेही एकाचवेळी पोलीस झाले.

Police Bharati
Poor Chief Minister : देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण?, आकडेवारी आली समोर..

पोलीस भरतीची चौथी व अंतिम मेरिट लिस्ट आज जाहीर झाली. तिकडे डोळे लावून बसलेल्या चांडोह (ता.शिरूर) येथील तुषार शेलार आणि भाग्यश्री शेलार या दांपत्याची नावे त्यात झळकल्यानंतर या कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही. कुटुंबासमवेत हे दांपत्य आपल्या शेतात कांदा काढणीचे काम करीत होते.

त्याचवेळी ही ‘गुड न्यूज’ त्यांना मिळाली आणि शेतकरी कुटुंबातील या दांपत्याने शेतातच आनंदोत्सव साजरा केला. लग्न झाल्यापासून केवळ पोलीस भरतीचाच ध्यास घेतलेल्या या दांपत्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही व आनंदाच्या भरात तुषार याने पत्नीला चक्क उचलून घेत जल्लोष केला.

Police Bharati
JaganMohan Reddy : देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे तब्बल 'इतकी' संपत्ती !

तुषार व भाग्यश्री यांचा १७ जून २०२० रोजी विवाह झाला. सामान्य शेतकरी कुटुंबातील तुषार याला पोलीस व्हायचे होते. त्यासाठी विवाहापूर्वीपासून तो सराव करीत होता. कठोर मेहनत घेत होता. सातत्यपूर्ण व्यायामाबरोबरच अभ्यासावर लक्ष केंद्रित करूनही अपयश येत असल्याने तो काहीसा खचला होता. विवाह होऊन भाग्यश्री ही अर्धांगिनी म्हणून त्याच्या आयुष्यात आली आणि त्याचे भाग्यच उजळले.

पतीची मानसिकता समजून घेत पत्नीने त्याला सर्वतोपरी खंबीर साथ दिली. इतकेच नव्हे तर स्वतःदेखील पोलीस होण्यासाठी पतीच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरली. कौटुंबिक आनंदाचा काहीसा अव्हेर करीत या नवदांपत्याने व्यायाम, अभ्यास आणि कठोर मेहनतीने पोलीस भरतीचा सराव केला आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना आज यशाचे गोड फळ लागले आहे.

Police Bharati
Congress News : काँग्रेसचा मोठा निर्णय; सतेज पाटील, प्रणिती शिंदे, अतुल लोंढेंवर सोपवली नवी जबाबदारी

अन् स्वप्न प्रत्यक्षात उतरले...

माझी आई कुसुम शेलार हीने पाच वर्षे गावचे सरपंचपद सांभाळले. त्या कालावधीत तीने खूप चांगली कामे केली. ते पाहत असताना आपणही समाजासाठी काहीतरी करावे, हा ध्यास लागला. कौटुंबिक स्थिती बेताची, आर्थिक पाठबळ कमकुवत असल्याने अखेर पोलीस होऊन समाजसेवा करण्याचा ध्यास घेतला. पण, अपयश पाठ सोडत नव्हते. अखेर पत्नी भाग्यश्री हिची सक्रिया साथ लाभली. वडील, मोठा भाऊ, वहिणींनी सर्वतोपरी सहकार्य केल्याने स्वप्न प्रत्यक्षात उतरले, अशी प्रतिक्रिया तुषार शेलार यांनी दिली.

Police Bharati
Ravikant Tupkar Join NCP? : तुपकर राष्ट्रवादीच्या वाटेवर? खडसे म्हणतात, " ते सर्वांना हवेहवेसे..."

पतीच्या जिद्द अन् चिकाटीने मलाही प्रेरणा...

आई-वडीलांप्रमाणे जीव लावणारे सासू-सासरे, बहिणीची माया लावणारी जाऊ आणि भावाप्रमाणेच पाठीशी खंबीर उभे राहिलेले दीर, या सर्वांच्या पाठबळामुळे पतीच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वस्व झोकून दिले. त्यातून मलाही पोलीस दलात जाण्याची प्रेरणा मिळाली. पतीच्या खांद्याला खांदा लावून व्यायाम, अभ्यास करताना सरावातून दोघांनाही हे यश मिळवता आले. पतीची जिद्द अन् चिकाटी मलाही प्रेरणा देऊन गेली, अशी प्रतिक्रिया भाग्यश्री शेलार यांनी दिली.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com