Pune Lok Sabha: प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोहोळ यांच्यासाठी पुण्यात फडणवीस तळ ठोकून, मायक्रो प्लॅनिंग...

Devendra Fadnavis And Murlidhar Mohol: मागील अनेक दिवसांपासून पुणे लोकसभेसाठी सुरु असणारा प्रचार आज बंद होणार आहे. तर सोमवारी (13 मे) रोजी या मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. पुणे हे राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक आहे, त्यामुळे पुणं आपल्या ताब्यात असावं असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं.
Devendra Fadnavis, Murlidhar Mohol
Devendra Fadnavis, Murlidhar MoholSarkarnama

Pune Lok Sabha Election 2024: मागील अनेक दिवसांपासून पुणे लोकसभेसाठी सुरु असणारा प्रचार आज बंद होणार आहे. तर सोमवारी (13 मे) रोजी या मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. पुणे हे राज्यातील प्रमुख शहरांपैकी एक आहे, त्यामुळे पुणं आपल्या ताब्यात असावं असं प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं. त्यामुळे पुणे लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार हे पहिल्यापासून सर्वांना माहिती होतं.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यामध्ये थेट लढत होणार असं वाटत असतानाच मनसेचे बंडखोर आणि सध्या 'वंचित'च्या गोटात गेलेल्या वसंत मोरेंमुळे ती तिरंगी लढत झाली. त्यामुळे या मतदारसंघातील रंगत वाढली. पण सध्या पुण्याची जागा आपल्याकडेच रहावी यासाठी भाजप चांगलीच कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणत्याही परिस्थिती पुण्याचा गड राखण्यासाठी भाजपचे (BJP) जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोहोळांसाठी निवडणुकीची सूत्रं हातात घेतली असून फडणवीस काल रात्रीपासून पुण्यात मुक्कामी आहेत. तर काल रात्री उशीरापर्यंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पुण्यातील भाजप नेत्यांबरोबर बैठका सुरु होत्या.

दरम्यान, आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकांच सत्र सकाळपासून सुरु होतं. शिवाय मुरलीधर मोहळ यांच्यासाठी त्यांची गोखले नगरमध्ये सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोहोळ यांच्यासाठी पुण्यात फडणवीस तळ ठोकून मायक्रो प्लॅनिंग करत असल्याचं बोललं जात आहे.

शेवटच्या दिवशी सभांचा धुरळा

आज हडपसरमध्ये अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यासठी शरद पवार (Sharad Pawar) आणि आदित्य ठाकरे यांची एकत्रित सभा झाली. तर श्रीरंग बारणे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पिंपरी चिंचवडमध्ये रोड शो होता. अमोल कोल्हे यांचा नारायणगावमधे सकाळपासून प्रचार सुरु होता शेवटी त्यांनी तिथेच शेवटची सांगता सभा घेतली. शिवाय यावेळी त्यांनी थेट अजित दादांना आव्हान देखील दिलं.

Devendra Fadnavis, Murlidhar Mohol
Shirur Lok Sabha: आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर..., कोल्हेंचं थेट अजितदादांना आव्हान

मुरलीधर मोहळ यांच्यासाठी नितिन गडकरींची सभा झाली. तर रवींद्र धंगेकरांसाठी सुप्रिया सुळेंचा रोड शो झाला. अजित पवारांनी आढळराव पाटील यांच्यासाठी खेडमधे सांगता सभा घेतली. चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडणार आहे. तर नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघासाठी हे मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com