Pune Metro: नवा मुहूर्त! पंतप्रधान मोदी पुणे मेट्रोचे रविवारी करणार VIDEO कॉन्फरन्सद्वारे उद्धघाटन

PM Narendra Modi show green flag through video conference: पुण्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गुरूवारी होणारे मेट्रोचे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे लोकार्पण रद्द करण्यात आले होते. त्यामुळे नवी तारीख कधी जाहीर होणार या बाबत चर्चा सुरू होत्या.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Pune News: मुसळधार पावसामुळे रद्द झालेल्या पुणे मेट्रोच्या (Pune Metro) भुयारी प्रकल्पाच्या उद्धघाटनला मुहूर्त मिळाला आहे. येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरंन्सद्वारे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवविण्यात येणार आहे. मेट्रोची जिल्हा न्यायालय ते स्वारगेट ही भुयारी मार्गाची सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.

दोन दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. काल (गुरुवारी) मोदींच्या हस्ते (PM Narendra Modi) या मेट्रो सेवेचे उद्धघाटन होणार होते, मोदींची एस.पी. कॉलेजच्या मैदानावर सभा होणार होती. पण पावसामुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आला. त्यानंतर मेट्रोचे उद्धघाटन कधी होणार याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली होती.

पुण्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गुरूवारी होणारे मेट्रोचे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे लोकार्पण रद्द करण्यात आले होते. त्यामुळे नवी तारीख कधी जाहीर होणार या बाबत चर्चा सुरू होत्या. आता नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयापासून ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोचे उद्घाटन रविवारी (ता. २९) पंतप्रधान मोदींच्या हस्ते केले जाणार आहे.

PM Narendra Modi
RSS New Office: RSS मुख्यालयाचा पता बदलणार? मोहन भागवत करणार 'केशवकुंज' मध्ये लवकरच प्रवेश

सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो कशी असेल?

  • सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास केवळ १० मिनिटांत

  • ऑनलाइन, ऑफलाइन तिकीट काउंटर सुविधा

  • सिव्हिल कोर्ट ते कसबा मेट्रो स्थानक अंतर : ८५३ मीटर

  • कसबा पेठ ते मंडई मेट्रो स्थानक अंतर : १ किमी

  • मंडई ते स्वारगेट मेट्रो स्थानक अंतर : १.४८ किमी

  • सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो स्थानक एकूण अंतर : ३.३४ किमी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com