Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे यांची नियुक्ती

Pune News : महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यांची वर्णी या पदावर अपेक्षीत असताना...
Pune municipal corporation Additional commissioner
Pune municipal corporation Additional commissioner Sarkarnama
Published on
Updated on

Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या रिक्त असलेल्या अतिरिक्त आयुक्त पदावर महापालिकेच्या सेवेतीलच अधिकाऱ्यांची वर्णी लागणे अपेक्षीत होते. मात्र भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील अधिकारी विकास ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेले विकास ढाकणे पावणे दोन वर्ष पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदाच्या तीन जागा आहेत. त्यापैकी एका जागेवर सेवा ज्येष्ठतेनुसार महापालिकेच्या सेवेतील अधिकाऱ्यास या पदावर पदोन्नती दिली जाते. यापूर्वी सुरेश जगताप, ज्ञानेश्‍वर मोळक आणि विलास कानडे या तिघांची या पदावर नियुक्ती झाली होती.

Pune municipal corporation Additional commissioner
Abdul Sattar : सत्तारांच्या अडचणी वाढणार? राज्यपालांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान, सप्टेंबर महिन्यात विलास कानडे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. या पदासाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला, व्ही.जी. कुलकर्णी, पीएमआरडीए येथे प्रतिनियुक्तीवर असलेले विवेक खरवडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची नावे चर्चेत होती. त्यांचा अंतरिम अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून, विभागीय चौकशी अहवाल आणि गोपनीय अहवाल शासनाकडे पाठविण्याची प्रक्रिया सुरू होती, अशी माहिती सेवक वर्ग विभागाकडून देण्यात आली आहे. (Pune municipal corporation Additional commissioner)

Pune municipal corporation Additional commissioner
Nana Patekar : नाना पाटेकर म्हणाले, राजकारणातून समाजसेवा करण्याचे ‘हे’ उत्तम उदाहरण...

या दरम्यानच भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केल्याचा आदेश राज्य नगरसचिव विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी काढले आहेत. ढाकणे यांनी शुक्रवारी महापालिकेत हजर होऊन या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ढाकणे हे पावणे दोन वर्ष पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते. कोरोनाच्या काळात त्यांनी तेथे आरोग्य सेवा देण्यासाठी विशेष काम केले. त्यांच्या कारकिर्दीत स्वच्छता, प्रशासकीय काम यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेला शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. (Pune Municipal Corporation News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com