पुणे महानगरपालिका : राग अनावर झाल्याने नगरसेविका कदम भांडल्या आणि मग रडल्या !

जाब विचारत महिला सदस्यांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक अडवले जात असल्याचा आरोप केला.
पुणे महानगरपालिका भवन
पुणे महानगरपालिका भवनसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील महापालिकेच्या दवाखान्यात सीटी स्कॅन मशिन बसवण्याचा प्रस्ताव आयत्यावेळी दाखल केल्यानंतर त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत त्वरीत निर्णय होत नसल्याचे लक्षात येताच स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अश्‍विनी कदम यांनी जाब विचारत महिला सदस्यांचे प्रस्ताव जाणीवपूर्वक अडवले जात असल्याचा आरोप केला.यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

पुणे महानगरपालिका भवन
आमदारांनी घेतला बिल्डरचा चावा; येरवडा तुरूंगातील घटना

खासगी दवाखान्यात सिटी स्कॅन महाग असल्याने महापालिकेतर्फे सिटी स्कॅन मशिन खरेदी करण्यासाठी अश्‍विनी कदम यांनी प्रस्ताव ठेवला आहे. त्यामध्ये ‘स’ यादीतून २ कोटी रुपये उपलब्ध केले आहेत. तर प्रशासनाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या निधीतून ३१ लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव लोकांच्या हिताचा असल्याने त्यास त्वरित मंजुरी मिळेल असे कदम यांना वाटले, मात्र, स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव मंजूर न करता पुढच्या बैठकीपर्यंत तो पुढे ढकलण्यात आला.

पुणे महानगरपालिका भवन
राज्य सरकारची दोन वर्षे विकासाची नव्हे तर विनाशाची

वैद्यकीय महाविद्यालय अद्याप सुरु झालेले नाही, असे असताना एक महिला नगरसेवक म्हणून काम करताना प्रकल्प अडवले जात आहेत. यापूर्वी देखील माहिती घेण्याच्या नावाखाली माझे प्रस्ताव अडविण्यात आले आहेत, असा आरोप कदम यांनी केला.या प्रकाराची महापालिकेच्या परिसरात चर्चा सुरू झाली.

दरम्यान, या संदर्भात बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले, ‘‘ बैठक संपत आली असताना अश्विनी कदम यांचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला होता. त्यामुळे याची माहिती द्यावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केल्याने हा प्रस्ताव दाखल करून पुढच्या बैठकीत मान्य केला जाईल.’’

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com