PMC Covid Scam : चौकशीचा भुंगा कोणाच्या मागे लागणार? 500 कोटी रुपयांच्या निविदांमधील घोळ उघड होणार

Pune Municipal Corporation Covid Scam : पुणे महापालिकेतील कोविड घोटाळ्यात आपले हात ओले करणाऱ्यांची आता खैर नाही...
PMC Covid Scam
PMC Covid ScamSarkarnama
Published on
Updated on

चैतन्य मचाले-

Pune Municipal Corporation News : कोविड काळात पुणेकरांवरील उपचारासाठी पुणे महापालिकेच्या साहित्य खरेदी प्रकरणात तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने कोविडमधील खरेदीच्या निविदा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. महापालिकेने काढलेल्या तब्बल 500 कोटी रुपयांच्या निविदा चौकशीच्या फेऱ्यात सापडणार आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेतील जुन्या फायली पुन्हा उघडल्या जाऊन, चौकशीचा भुंगा कोणाच्या मागे लागणार, हे उघडपणे दिसणार आहे.

PMC Covid Scam
PMC Covid Scam : 'बीएमसी'पाठोपाठ 'पीएमसी'तही कोविड घोटाळा; 'त्या' संशयित मृतांची फाइल पुन्हा उघडली जाणार का?

मुंबईपाठोपाठ पुणे महापालिकेत आता कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे लोण पसरले आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात जवळपास 500 कोटी रुपयांच्या वस्तूंची खरेदी करण्यात आली. जम्बो कोविड सेंटरमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. त्यातच आता वारजे येथील कै. अरविंद बारटक्के रुग्णालयात करण्यात आलेल्या साहित्य खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याप्रकरणी वारजे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोविडच्या दोन वर्षांच्या काळात पालिकेच्या उपचार केंद्रात दाखल होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझर, हँड वॅाश, बेड, आॅक्सिजन सिलिंडर, चादरी, ट्रॅाली, अशा वस्तूंची खरेदी करण्यात आली होती. याबरोबरच कोरोना केंद्रांच्या बाहेर नागरिकांच्या सोयीसाठी मांडव, बसण्यासाठी खुर्ची, औषधे या वस्तूंची खरेदी करण्यात आली होती. ही खरेदी करताना प्रशासनाने काही ठिकाणी निविदा प्रक्रिया राबविली तर काही साहित्यांची खरेदी थेट पद्धतीने केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोविड सेंटर सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांमध्ये शिवाजीनगर येथे उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटर येथे 18 ते 22 रुग्णांचे मृत्यू झाले होते. हे मृत्यू नक्की कशामुळे झाले यावर कोणताही खुलासा झाला नव्हता. पालिकेच्या वतीने कोट्यवधी रुपयांच्या साहित्याची खरेदी झालेली असतानाही कोविड उपचार केंद्रांमध्ये पुरेसे साहित्य तसेच सोयी उपलब्ध होत नसल्याबाबत तक्रारी केल्या जात होत्या. त्यातच आता पोलिस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आल्याने कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात खरेदी करण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

चौकशीत जुन्या फायली उघडल्या जाणार असल्याने काम देताना प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कोणत्या ठेकेदाराला झुकते माप दिले. यामध्ये राजकीय पक्षाच्या कोणत्या नेत्याने तसेच पदाधिकाऱ्यांनी ठराविक व्यक्तीलाच काम द्यावे, यासाठी आग्रह धरला का, यासह अन्य माहिती यानिमित्ताने समोर येण्याची शक्यता आहे. कोविड सेंटरचे नियोजन पालिकेतील अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली होत असल्याने ही फाइल पुन्हा उघडली गेल्यास अनेक अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Edited By Sachin Fulpagare

PMC Covid Scam
PMC Covid Scam : अटकपूर्व जामिनासाठी तत्कालीन आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारतींच्या जोरदार हालचाली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com