
🔹 Summary:
पुणे महापालिकेने टीडीआर विभागातील दोन अधिकाऱ्यांना — कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ — निलंबित केले आहे.
बाणेर येथील इमारतीला पाच मजल्यांची परवानगी असूनही दोन मजले अतिरिक्त बांधकाम झाले होते.
अनधिकृत बांधकामाची माहिती वरिष्ठांना न दिल्यामुळे या अधिकाऱ्यांवर कर्तव्यभंगाची कारवाई करण्यात आली.
Pune News: देशात दिवाळी उत्साहात साजरी होत असताना पुण्यातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांनी दिवाळी 'काळी'ठरली आहे. ऐन दिवाळीत या दोन अधिकाऱ्यांना पुणे महापालिका प्रशासनाने घरचा रस्ता दाखवला आहे. त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या दोन अधिकाऱ्यांना दणका दिला आहे. महापालिकेतील टी डी आर खर्ची विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता असे हे दोन अधिकारी आहेत. टी डी आर विभागातील कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ असे निलंबन झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव आहे.
बाणेर परिसरातील एका इमारतीला महापालिकेकडून फक्त पाच मजल्यांची बांधकाम परवानगी होती. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने दोन अतिरिक्त मजल्या (सहावा आणि सातवा) वाढवण्यासाठी अर्ज केला होता.
परवानगी मिळण्यापूर्वीच सहाव्या मजल्याचे काम पूर्ण झाले आणि सातव्या मजल्याचे काम सुरू झाले. हे अनधिकृत बदल अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणले नाहीत, त्यामुळे त्यांच्या कर्तव्यभंगाची कारवाई करण्यात आली आहे.
🔹 FAQs:
1. कोणत्या विभागातील अधिकारी निलंबित झाले?
टीडीआर खर्ची विभागातील अधिकारी निलंबित झाले.
2. निलंबित अधिकाऱ्यांची नावे कोणती?
शुभांगी तरुकमारे आणि संदीप मिसाळ.
3. बाणेरमधील इमारतीला किती मजल्यांची परवानगी होती?
फक्त पाच मजल्यांची परवानगी होती.
4. कारवाईचे कारण काय दिले गेले?
अनधिकृत बांधकामाची माहिती न दिल्यामुळे कर्तव्यभंगाची कारवाई करण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.