Pune Mayor : कोल्हापुरातून एक फोन अन् पुण्यात महापौर निवड बिनविरोध; काँग्रेसची महापालिकेत पहिल्याच दिवशी सपशेल माघार

Pune Mayor : पुणे महापालिकेत अखेर भाजपच्या मंजुषा नागपुरे यांची महापौरपदी, तर परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी माघार घेतल्याने निवडणूक केवळ औपचारिकता ठरली.
BJP’s Manjusha Nagpure and RPI(A)’s Parshuram Wadekar celebrating their unopposed election as Mayor and Deputy Mayor of Pune
BJP’s Manjusha Nagpure and RPI(A)’s Parshuram Wadekar celebrating their unopposed election as Mayor and Deputy Mayor of PuneSarkarnama
Published on
Updated on

Pune Mayor : पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार दिला जाणार नव्हता. पण काँग्रेसने उमेदवार देत राष्ट्रवादीवर टीका केली होती. मग राष्ट्रवादीने ऐनवेळी उमेदवार दिला. त्यामुळे या दोन्ही पदावर आज (ता. ९) निवडणूक होईल अशी अपेक्षा होती. पण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापूरवरून अर्ज मागे घ्या असा आदेश आला आणि महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे आक्रमक विरोधकांची भूमिका घेणार अशी वल्गना काँग्रेसकडून दिली जात असताना पहिल्याच दिवशी मात्र सपशेल माघार घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुणे महापालिकेत भाजपने ११९ जागा जिंकून एकहाती सत्ता काबीज केली आहे. सभागृहात विरोधीपक्षाचे नगरसेवक कमी असले तरी आम्ही आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधाऱ्यांना नामोहरम करू अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी दिल्या होत्या. महापालिकेची निवडणूक मैत्रीपूर्ण लढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार दिला जाणार नव्हता. पण अचानक काँग्रेसने अर्ज भरला आणि राष्ट्रवादीवर भाजपला केलेल्या मदती वरून टीका केली. त्यामुळे राष्ट्रवादीची फरफट होऊन त्यांनाही अचानक उमेदवार द्यावा लागला.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी खासदार सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली म्हणून भाजपने ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले होते. काँग्रेसचे नगरसेवक यासाठी तयार नव्हते. पण मात्र, सोमवारी सकाळी कोल्हापूरच्या नेत्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना फोन करून महापौर व उपमहापौर पदाचा अर्ज मागे घ्यावा असे आदेश देण्यात आले.

BJP’s Manjusha Nagpure and RPI(A)’s Parshuram Wadekar celebrating their unopposed election as Mayor and Deputy Mayor of Pune
Pune ZP Result : पुण्यात राष्ट्रवादीच ‘दादा’; विरोधकांना चारळी धूळ, पुन्हा एकहाती सत्ता काबीज

भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीने अर्ज माघार घेतला तर आम्हीही माघार घेऊ अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली. त्यानुसार राष्ट्रवादीने दोन्ही अर्ज माघारी घेतले. पुढच्या काही मिनिटात काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम व भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्यात चर्चा होऊन त्यांनी ही अर्ज मागे घेतले. पण काँग्रेसने अर्ज मागे घेतल्याचे त्यांच्या अनेक नगरसेवकांच्या पचनी पडले नाही. आम्ही सुरवात आक्रमक करतो आणि परत माघार घेऊन पक्षाचे महत्त्व कमी करतो अशा शब्दात काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

BJP’s Manjusha Nagpure and RPI(A)’s Parshuram Wadekar celebrating their unopposed election as Mayor and Deputy Mayor of Pune
Pune ZP Election : संग्राम थोपटेंनी गेम फिरवला; दिवंगत अजितदादांनी ZP अध्यक्षपदाचा शब्द दिलेल्या उमेदवारालाच दाखवले आस्मान!

सभागृहात घुसखोरी :

महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या वेळी अनेक युट्यूबर, रील स्टार, नगरसेवकांचे सोशल मीडिया सांभाळणारे कार्यकर्ते महापालिकेत आले. त्यांनी महापालिकेच्या सभागृहात घुसखोरी करत व्हिडिओ शूटिंग करणे सुरु केले. नियमांचे उल्लंघन होत असूनही त्यांना कोणीही मज्जाव केला नाही. तसेच पत्रकारांना पासेस दिलेले असताना पत्रकारांच्या गॅलरीत हे रिलस्टार, कार्यकर्ते व्हिडिओ काढण्यासाठी घुसले. यात काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही घुसलेले होते. पण यांच्यावर नियंत्रण आणताना महापालिका प्रशासन हतबल झाल्याचे दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com