कोरोनातील कामगिरीची पाठ थोपटून घेण्यासाठी पुणे महापालिका करणार ३० लाखाचा खर्च

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविताना महापालिकेच्या नाकीनऊ आले होते.
पुणे महापालिका भवन
पुणे महापालिका भवनसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबांची वाहाहत झाली, घरातील प्रमुख व्यक्ती गमविण्यासह आर्थिक संकटही ओढवले. त्यातून अनेक कुटुंबे सावरलेली नाहीत. मात्र, पुणे महापालिका (PMC) या काळात केलेले काम लोकांसमोर आणून स्वत:ची पाठ थोपटून घेण्यासाठी तब्बल ३० लाख रुपये खर्च करून कॉफिटेबल बुक (Coffee table Book) तयार करणार आहे.

पुणे महापालिका भवन
पुणे जिल्ह्यात रूग्णसंख्या चार दिवसात आठ हजाराने कमी

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविताना महापालिकेच्या नाकीनऊ आले होते. या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात खर्च आहे, अनेक उपकरणे, वस्तू महागड्या दराने खरेदी केल्या आहेत. या सर्व खर्चाचा तपशील असणारा अहवाल सादर करण्याचे आदेश महापालिकेच्या मुख्यसभेने सुमारे चार महिन्यांपूर्वी दिले होते. त्यावर एक खाससभा घेऊन चर्चा देखील केली जाणार होती. मात्र, याचा विसर पडलेला असताना आता प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून कॉफिटेबल बुकसाठी ठेकेदारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

पुणे महापालिका भवन
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

विशिष्ट व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून निविदेसाठी अटी आणि शर्ती तयार करण्यात आल्या असून, प्रतिष्ठीत व्यक्ती किंवा मान्यताप्राप्त संस्थांच्या पुस्तकाचे किमान २० लाख रुपयांचे काम केलेले असावे, संबंधितांना संशोधन पुस्तकांचा अनुभव असावा. निविदाधारक संस्था पुण्यातील असली पाहिजे अशा अटी टाकण्यात आल्या आहेत.

‘‘कोरोनाच्या काळात महापालिकेने विविध प्रकारची कामे केली आहेत. या कामाचा आढावा घेणारे पुस्तक तयार केले जाणार आहे. यामध्ये लोकप्रतिनिधी,अधिकारी यांचे अभिप्राय असणार आहेत. हे पुस्तक तयार करण्यासाठी बी पाकीट पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत, अशी माहिती महानगरपालिकेचेर् आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.

महापालिकेकडून काढल्या जाणाऱ्या पुस्तकात कोरोना साथीचा प्रादुर्भाव- प्रसार, साथीच्या काळात महापालिकेने त्यावर नियंत्रण कसे मिळवले. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी काय प्रयत्न केले. कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असलेले लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या मुलाखती, पुरविलेल्या विविध सेवा, स्बॅव टेस्टिंग,क्ष किरण तपासणी, फिरत्या बसमधून कोरोनाची चाचणी करण्यात आले. तसेच सीएसआर निधीतून मिळालेले साहित्य, पीपीई कीट, एन-९५ मास्क, वैद्यकीय उपकरणे, औषधे आदीचे करण्यात आलेले वाटप याची माहिती या पुस्तकातून मांडली जाणार आहे. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी, डॉक्टर आपल्या द्वारी, एकापेक्षा जास्त आजार असणाऱ्यांचे प्राण वाचविण्यासाठी केलेल्या उपाययोजना याचा या पुस्तकात समावेश असेल. २२० ते २५० पानाचे हे पुस्तक असणार असून, यासाठी मोठ्याप्रमाणात फोटोचाही वापर केला जाणार आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com