PMC Election 2025: पुणे महापालिकेत दिसणार नाहीत दिग्गज चेहरे : दोन महापौरांसह सहा माजी नगरसेवक यंदा रिंगणाबाहेर

Pune Mahapalika Election News update: 2017 मध्ये नगरसेवक असलेले सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चेतन तुपे, हेमंत रासने हे देखील आमदार झाले आहेत. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर आमदार झाले होते.
Pune Mahapalika Election News update
Pune Mahapalika Election News updateSarkarnama
Published on
Updated on

पुणे महापालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाली असून महानगरपालिकेच्या मावळत्या सभागृहातील म्हणजेच सन 2017-2022 या कार्यकाळातील अनेक दिग्गज नगरसेवकांचे हक्काचे मतदारसंघ (वॉर्ड) विविध प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत.

त्यामुळे हे दिग्गज नगरसेवक पुणे महापालिकेच्या आगामी पाच वर्ष कालावधीच्या सभागृहात पुन्हा दिसणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. यापैकी काही माजी नगरसेवकांना आपापल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींना संधी मिळू शकणार आहे.

2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ महापौर झाले होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मुक्ता टिळक या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले, तर मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोहोळ हे खासदार आणि केंद्रात मंत्री झाले. त्यामुळे मागील टर्मचे दोन्ही महापौर देखील सभागृहात दिसणार नाहीत.

याशिवाय 2017 मध्ये नगरसेवक असलेले सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, चेतन तुपे, हेमंत रासने हे देखील आमदार झाले आहेत. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर आमदार झाले होते. त्यानंतर ते लोकसभा व विधानसभा निवडणूक लढले; परंतु त्यांचा पराभव झाला. सुनील टिंगरे हे ही २०१९ मध्ये आमदार झाले पण २०२४ मध्ये पराभूत झाले. आता हे दोघेही पुन्हा महापालिका निवडणूक लढवतील, याची जवळपास शक्यता नाही.

Pune Mahapalika Election News update
NCP News: चंदगड पाठोपाठ आता सांगलीतही राष्ट्रवादी एकत्र; मानसिंगराव नाईकांच्या निर्णयाचा विरोधकांना धसका

महापालिकेची निवडणूक ही प्रभाग पद्धतीने होणार आहे. यानुसार प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक असणार आहेत. या सर्व प्रभागांमधून प्रवर्गनिहाय राखीव जागा या आरक्षण सोडतीत निश्चित करण्यात आल्या आहेत.यामुळे अविनाश बागवे,आबा बागुल, सुनीता वाडेकर, सरस्वती शेंडगे, श्रीनाथ भीमाले, प्रवीण चोरबेले, मनिषा लडकत आदींचे मतदारसंघ (वॉर्ड) हे राखीव झाले आहेत.

पुण्यातील प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षणातील बदलांमुळे प्रमुख पक्षांना उमेदवारी ठरवताना नवे गणित मांडावे लागले. विशेष म्हणजे, भाजपने यावेळी तरुण आणि नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देत जुन्या नेत्यांना विश्रांती दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये गटबाजी आणि अंतर्गत धूसफूस स्पष्ट दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com