Pune BJP : पक्षनिष्ठा असावी तर अशी! आता भाजप संधी देणार का? निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

PMC election : पक्ष आदेशानुसार उमेदवारी मागे घेतलेल्या पुण्यातील भाजप कार्यकर्त्याची निष्ठा चर्चेत आहे. पक्ष शिस्त पाळूनही संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये खंत, यावेळी उत्सुकता वाढली आहे.
A loyal BJP Member Satish Bahirat demand Nomination ahead of PMC elections.
A loyal BJP Member Satish Bahirat demand Nomination ahead of PMC elections.Sarkarnama
Published on
Updated on

Pune MahaPalika Election News : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे बिगूल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. उमेदवारी जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत इच्छुक उमेदवार आस लावून बसले आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षाचा आदेश सर्वश्रेष्ठ मानून काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आजही बोटावर मोजण्याइतकेच दिसतात.

2017 साली झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून तत्कालीन शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष सतीश बहिरट यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – वाकडेवाडी (प्रभाग क्रमांक 7) येथून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पक्षाकडून तिकीट देऊन, त्यांना एबी फॅार्म देण्यात आला. त्यानुसार बहिरट यांनी प्रशासनाकडे उमेदवारी अर्जही दाखल केला होता. मात्र, पक्षातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांना उमेदवारी ऐनवेळी अर्ज मागे घ्यावा लागला होता.

पक्षाचा आदेश सर्वश्रेष्ठ मानत बहिरट यांनी कोणतीही नाराजी न दाखवता माघार घेतली. त्या जागी इतर पक्षातून आलेल्या उमेदवाराला भाजपकडून संधी देण्यात आली. तरीही बहिरट यांनी पक्षनिष्ठा अबाधित ठेवत वरिष्ठांच्या सूचनेनुसार प्रभागातील सर्व भाजप उमेदवारांचा प्रचार केला. त्या प्रभागातून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आले.

A loyal BJP Member Satish Bahirat demand Nomination ahead of PMC elections.
PMC Election: भाजपकडूनच युतीधर्माचं पालन होत नसेल, तर आपणही...?'राष्ट्रवादीच्या बैठकीत वातावरण तापलं

पक्षाच्या या यशानंतर सतीश बहिरट यांना भविष्यात मोठी जबाबदारी किंवा संधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्षात बहिरट यांना कोणतीही मोठी संधी देण्यात आली नाही, अशी खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

A loyal BJP Member Satish Bahirat demand Nomination ahead of PMC elections.
Pune BJP Candidate List : भाजप उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला! पहिल्या यादीत 62 नावांवर शिक्कामोर्तब, शिवसेनेला 20 जागा?

बहिरट यांनी सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) काम केले असून, 1989 पासून ते भारतीय जनता पक्षात सक्रिय आहेत. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असलेल्या बहिरट यांना आगामी महापालिका निवडणुकीत गोखलेनगर – वाकडेवाडी (प्रभाग क्रमांक 7) येथून उमेदवारी मिळेल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांना वाटत आहे.

दरम्यान, पक्षनिष्ठा जपणाऱ्या कार्यकर्त्याला यावेळी भाजप संधी देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे या प्रभागातील उमेदवारीबाबतचा निर्णय उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com