

- कृष्णकांत कोबल
Pune Mahapalika : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये (रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी) आता समतोल विकासाची गरज आहे. समान पाणीपुरवठा, विकास आराखड्यातील रस्ते, उद्याने,स्मशानभूमी व एसआरएसारख्या रखडलेल्या प्रकल्पांना गती द्यावी लागणार आहे. त्यासाठी येथे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या तसेच, अनुभवी लोकप्रतिनिधींची गरज आहे. त्यामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनाच पुन्हा संधी द्या, असे आवाहन माजी उपमहापौर निलेश मगर यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अशोक वाटू कांबळे, हेमलता निलेश मगर, आनंद आण्णा आलकुंटे, संगीता दत्तात्रय तुपे यांच्या प्रचारार्थ प्रभागातून पदयात्रा व घरटी भेटीचे आयोजन केले होते. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना माजी उपमहापौर मगर बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसरचे आमदार चेतन तुपे, फुरसुंगी उरुळी देवाचीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष सरोदे, ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्र कोंडे हेही उपस्थित होते.
आमदार चेतन तुपे म्हणाले, "नव्याने निर्माण झालेला प्रभाग १७ रामटेकडी- वैदुवाडी- माळवाडीचा सर्व भाग राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच आहे. इतर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांप्रमाणे या प्रभागातही विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यांनी यापूर्वी आपापल्या प्रभागात दिलेले राजकीय आणि सामाजिक योगदान मोठे आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला पुन्हा अजिंक्यच राहणार आहे, असा मला विश्वास आहे.
दरम्यान, उमेदवारांनी प्रभागातील वैदुवाडी, शंकरमठ, रामटेकडी, गोसावी वस्ती, नवीन व जुना म्हाडा वसाहत, मार्कंडेयनगर, महात्मा फुलेनगर, आवटे वस्ती, आलकुंटे वस्ती, मिरेकर वस्ती, हिंगणे मळा, पारिजात कॉलनी, आनंद पार्क, ओरिएंट व्हिला, इंद्रप्रस्थ सोसायटी, सुभाष सामुदायिक सोसायटी, पवार कॉलनी आदी भागात पदयात्रा काढून मतदारांच्या घरटी भेटी घेत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत केले.
यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते विजय तुपे, अजित शेवाळे, श्रीपाद कदम, मयूर झारगड, गंगाधर मगर, विजय मगर, विशाल कोद्रे, बाळासाहेब गरुड, अरुण कुंभार, गजानन मगर, गणेश ससाणे, संतोष देशमुख, प्रशांत मगर, पवन दिवेकर, विजय फरगडे, बाळासाहेब जाधवराजे, अमिन शेख, नितीन भोरडे, ज्ञानेश्वर गायकवाड, अप्पाराव गायकवाड, लखन गवळी, ऋषिकेश तुपे, राज जाधव, विजय गुरव, काका खैरे आदी यावेळी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.