Pune News : भारतीय जनता पक्षांकडून (BJP) आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी आतापासूनच करण्यात येत आहे. लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुखांची निवड केल्यानंतर आता भाजपकडून जिल्हाध्यक्षांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुणे भाजपच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandashekhar Bawankule) यांनी त्यांची नियुक्ती केली. (Latest Marathi News)
भाजपने पुणे शहरात वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळी जबाबदारी देवून कामांची विभागणी केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची निवड केली आहे. तर महानगर पालिकेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचारप्रमुख म्हणून राजेश पांडे यांची निवड केली आहे. तसेच पुणे प्रभारी म्हणून माजी खासदार अमर साबळे यांची पुणे शहर प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची उचलबांगडी करून आता धीरज घाटे यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. घाटे यांच्यावर अखेर पक्षाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
धीरज घाटे हे मागील ३२ वर्षे सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. भाजपकडून कसबा मतदारसंघातून आमदारकी लढवण्यासाठी ते इच्छुक होते. घाटे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणूनसुद्धा निवडून आले होते. महापालिकेचे ते सभागृह नेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पुण्याच्या मध्यवर्ती भागात गणेश मंडळांशी घाटे यांचा अनेक वर्षांचा संपर्क आहे. साने गुरूजी मंडळ व हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षापासून घाटे काम करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.