Pune Political News: राजा बराटे-सुशील मेंगडेंचं बिनसलं ! कर्वेनगरात रंगणार दोस्तीत कुस्ती ?

PMC And BJP : पुणे महापालिकेचे गणित जुळवण्यासाठी बराटे-मेंगडेंबाबत भाजपच्या निर्णयाकडे लक्ष
Rajabhau Barate, Sushil Mengade
Rajabhau Barate, Sushil MengadeSarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Barate Vs Sushil Mengde: पुण्यातील कर्वेनगरातले भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजाभाऊ बराटे आणि याच पक्षाचे, याच भागातले दुसरे नगरसेवक सुशील मेंगडे... या दोघांची दोस्ती कर्वेनगरालाच काय साऱ्याला पुण्याच्या राजकीय वर्तुळात ठाऊक...! पण गेल्या दोन-अडीच वर्षांत काय घडलयं ? या दोघांच्या मैत्रीला कोणाची नजर लागलीय ? नेमकं कुठं बिनसलयं ? हे कळायला मार्ग नाही. पण राजाभाऊ आणि सुशील यांच्यातली दोस्ती संपली अन् ते आता एकमेकांचं तोंडही पाहायला तयार नाहीत ! (Latest Political News)

राजाभाऊंचा रविवारी वाढदिवस झाला; कर्वेनगरातल्या राजाभाऊंच्या चाहत्या, कार्यकर्त्यांपासून इतर पक्षांतल्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याकरिता राजाभाऊंचा मोबाईल दिवसभर खणखणत राहिला, तो घेऊन-घेऊन राजाभाऊंची दमछाक झाली. त्यात कुठेच सुशील मेंगडेंचा फोन सोडा, साधा ‘मेसेज’ दिसला नाही.

पाच-सहा वर्षांआधी एकमकांना भक्कम साथ देणारे, दोस्ती सांभाळणारे, ती वाढवणारे राजाभाऊ आणि सुशील यांच्यात दुरावा आलाय ! त्यांच्यातील मैत्री तुटली, ते एकमेकांचे नावही काढत नाहीत आणि कुणी काढलं तर ते टाळतात. राजाभाऊ-सुशील मेंगडे हे लांब झाले असले; तरीही सुशील यांचे वडील माजी नगरसेवक शिवराम मेंगडे हे मात्र, राजाभाऊंच्या वाढदिवसाच्या ‘सलिब्रेशन’मध्ये रात्री बारावाजेपर्यंत त्यांच्यासोबतच होते. हे दोघे नेहमीच एकत्र असतात.

Rajabhau Barate, Sushil Mengade
Maharashtra Monsoon Session : थोरातांचे पहिल्याच दिवशी शिंदे-फडणवीस-पवारांना चिमटे; ‘त्यांना खातेवाटप करायचं आहे, दिल्लीला जायचं आहे...’

कर्वेनगरातून राजाभाऊ हे तिसऱ्यांदा नगरसेवक आहेत. ते आधी दोनदा मनसे आणि २०१७ च्या महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये येऊन तिसऱ्यांदा निवडून आले. आधीपासूनच भाजपमध्ये असलेल्या सुशील आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत राजाभाऊंची मैत्री झाली. त्यातून एकमेकांची राजकीय ताकद वाढली. या मैत्रीचा दोघांना फायदा झाला; महापालिका निवडणुकीत राजाभाऊ, सुशील आणि वृषाली चौधरी भाजपच्या तिकिटावर जिंकले. तर याच प्रभागातून राष्ट्रवादीच्या लक्ष्मी दुधाणे निवडून आल्या आहेत. निवडणुकीनंतर राजाभाऊ-सुशील यांची जोड गोळी फेमस झाली. महापालिका आणि प्रभागात एकत्र कामे होऊ लागली. पण याच काळात दोघांत बिनसले आणि दोस्ताना अडचणीत आला.

Rajabhau Barate, Sushil Mengade
Monsoon Session 2023 Live: नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आणि विप्लव बाजोरियांना अपात्रतेची नोटीस !

या दोघांत काय झाले, याची अनेक अंगाने चर्चा रंगते; पण त्याचे नेमके कारण पुढे आलेले नाही. त्यातून एकाच प्रभागात राजाभाऊ-सुशील वेगवेगळे कार्यक्रम घेऊ लागले, अधिकऱ्यांचे दौरे आखू लागले, कामे रेटण्याची स्पर्धाच त्यांच्यात पाहायला मिळू लागली, बॅनरवरून एकमेकांचे फोटो हटवले गेले. त्यापलीडे जाऊन ते एक-दुसऱ्याला पाहून वाटही वाकडी करू लागले आहेत.

आता तर स्वत: कोणाचे नाव घेत नाही आणि दुसऱ्या कोणी त्यांची नावे काढली, तर विषयच बंद करतात. इतका तिरस्कार ते एकमेकांचा करीत आहेत. मात्र, किमान वाढदिवसाला तरी फोन होईल, मेसेज येईल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा रविवारी खोटी ठरली. राजाभाऊंना सुशील मेंगडेंचा फोन आला नाही आणि शुभेच्छाही मिळाल्या नाहीत. या दोघांमधील वादाचा फटका महापालिकेच्या पुढच्या निवडणुकीत बसणार की, त्याआधी दोघांत पुन्हा समेट घडणार हेही काळच ठरवणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com