Pune News: '' मंगलदास बांदलांचा मी जिवलग मित्र होतो; मी त्यांना सरपंच केलं,पण त्यांनी मलाच फसवलं...''

Mangaldas Bandal : माझी तक्रार फक्त हिमनगाचे एक टोक असून अजूनही बरेच गुन्हे मंगलदास बांदल यांच्यावर दाखल आहेत.
mangaldas bandal
mangaldas bandalsarkarnama
Published on
Updated on

Mangaldas Bandal News: मंगलदास बांदल यांचा कधीकाळी मी जिवलग मित्र होतो. त्यांना शिक्रापूरचं सरपंच देखील केलं. मात्र, त्यांनी माझीच फसवणूक करुन अडीच कोटींचा बोजा माझ्या मालमत्तेवर टाकला तेव्हा मी धाडसाने पुढे आलो आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पण आता माझ्यावर प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकऱणी आता शिक्रापूर सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांनी मोठा खुलासा केला आहे.

mangaldas bandal
Congress News: भारत जोडोनंतर कॉंग्रेसचे लक्ष्य ‘हाथ से हाथ जोडो’, सहभागी नसलेल्यांची पदे काढणार !

दत्तात्रय मांढरे यांनी सरकारनामाशी संवाद साधला. यावेळी मांढरे म्हणाले, माझ्यावर गुन्हा दाखल झाला तो कुठल्याही फसवणुकीचा नाही तर पाटबंधारे खात्याच्या जागेवर प्लॉटिंग व स्क्रॅप धंदेवाल्यांसाठी ज्यांनी रस्त्याचं अतिक्रमण करण्याला प्रारंभ केला होता. त्यांना कायदेशीर अटकाव केल्यानं माझ्यावर प्रतिबंधात्मक गुन्हा दाखल आहे. मात्र, आपण आता संबंधित तलाठी यांच्या संपूर्ण सेवा कारकिर्दीची चौकशीची मागणी करत असून यासाठी आमदार अशोक पवारांसह (Ashok Pawar)जिल्हाधिकारी आणि महसूल मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करणार आहे.

mangaldas bandal
Pune G20 News: जी २० च्या प्रतिनिधींनी पुण्यातील शनिवारवाडा, आगाखान पॅलेसह ऐतिहासीक वारसास्थळांना दिल्या भेटी

मंगलदास बांदलांना (Mangaldas Bandal) जेलवारी घडविणार्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर गुन्हा दाखल या शीर्षकाखाली वृत्त प्रसिध्द झालं होतं. त्यात बांदलांचे कधीकाळी जिवलग मित्र राहिलेले व सध्या शिक्रापूर सोसायटीचे माजी अध्यक्ष असलेले दत्तात्रय मांढरे यांचेवर शेतक-यांचा रस्ता अडविल्याचा गुन्हा दाखल झाल्याचा आषय वृत्ता मांडताना बांदलांच्या अटकेनंतर मांढरेंना सोसायटी अध्यक्षपद दिले गेल्याचाही उल्लेख केला होता. यावर दत्तात्रय मांढरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मांढरे नेमकं काय म्हणाले ?

माझ्या वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला तहसीलदार सुनावणीसाठी हजर राहता आले नाही. मात्र, माझ्यावर दाखल गुन्ह्याबाबत मी योग्य तो खुलासाही शासनाकडे सादर केला आहे. तसेच मंगलदास बांदल यांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मी तक्रारदार आहे ही वस्तुस्थिती असून माझी तक्रार फक्त हिमनगाचे एक टोक असून अजूनही बरेच गुन्हे मंगलदास बांदल यांच्यावर दाखल आहेत.

मी तक्रार दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पार्श्वभूमी समजून घेतल्यास यात मंगलदास बांदल यांनी माझ्या नावाचा दुरुपयोग करून माझ्या नावाने भलत्याच इसमास उभे करून तळेगाव ढमढेरे येथे बोगस्त नोंदणी केली. सदर दस्तावर शिवाजीराव भोसले बँकेकडून कोट्यवधी रुपयांची कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com