Pune News: मंत्र्यांचे दौरे रद्द पण अधिकारी निघाले डेन्मार्कला; पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही निघणारा दौरा वादाच्या भोवऱ्यात

राज्य सरकारच्या 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' (मीत्रा) या विभागातर्फे हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

पुणे : देशावर गंभीर आर्थिक संकट निर्माण होणार असल्याने परदेश दौरे टाळावे, पैशाची बचत करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले असताना दुसरीकडे पाणी पुरवठ्याचे व्यवस्थापन याचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील काही प्रमुख अधिकारी १५ मे पासून डेन्मार्क मधील कोपनहेगन शहराच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे आता हा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi
Gokul Row: गोकुळचा वाद अखेर महाडिकांच्या जावयांपर्यंत गेलाच! मुश्रीफ गटाकडून नव्या लढाईला सुरुवात

राज्य सरकारच्या 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' (मीत्रा) या विभागातर्फे हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. मुंबई, पुण्यासह अन्य शहरातील अधिकारी चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पाणी पुरवठा व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे व्यवस्थापन आणि शहर विकास यांमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हा 'अभ्यास दौरा' आयोजित करण्यात आला आहे.

कोपनहेगनमधील प्रकल्पांची पाहणी करून तेथील प्रारूप महाराष्ट्रात कसे राबवता येईल, याचा अभ्यास हे अधिकारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

PM Narendra Modi
Ambadas Danave: अंबादास दानवे पुन्हा आमदार झाले पण पक्षातील रिक्तपदांमुळे पेच कायम!

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने कान महोत्सवाला शिष्टमंडळ पाठवणार नसल्याचे जाहीर केले आहे. काटकसर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याने या मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहेत. पण आता राज्य सरकारचा मित्रा हा विभाग काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

उद्देश चांगला पण वेळ चुकली

महाराष्ट्रात शहरीकरणाचा वेग प्रचंड आहे, त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रश्‍न गंभीर होत असल्याने अधिकाऱ्यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे. यातून महाराष्ट्रात प्रकल्पाच्या अंमलबजावणीत बदल होऊ शकतो असा उद्देश आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश दौरे टाळण्याचे आवाहन केले आहे. अनेक नागरिकांनी परदेशी पर्यटन रद्द केले आहे, असे असताना राज्य सरकारच्या मित्रा या विभागाला परदेश दौऱ्याचा मोह टाळता आलेला नाही. मात्र, आता ही बाब बाहेर आल्यानंतर नियोजित दौरा रद्द होणार की अधिकाऱ्यांची ‘परदेशी’ सहल होणार याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com