Bhagyashree Navtake: IAS पूजा खेडकर यांच्यानंतर आणखी एका IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण

Pune Police File Against IPS Bhagyashree Navtake: बीएचआर प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे पुणे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Bhagyashree Navtake
Bhagyashree NavtakeSarkarnama
Published on
Updated on

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्यानंतर पुण्यात आणखी एका आयपीएस (IPS) महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. गृहविभागाच्या आदेशानंतर पुणे पोलिसांनी IPS भाग्यश्री नवटक्के (Bhagyashree Navtake) यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बीएचआर प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नवटक्के यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे पुणे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जळगाव मधील गाजलेल्या भाईचंद हिरांचद रायसोनी क्रेडिट सोसायटीतील (बीएचआर) घोटाळा प्रकरणात आणखी कुणाची नावे समोर येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राजकीय दबावामुळे आपल्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचा दावा भाग्यश्री नवटक्के यांनी केला आहे.

बीएचआर पतसंस्थेने ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी २०२१ मध्ये गुन्हा दाखल होता. त्यावेळी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त म्हणून नवटक्के कार्यरत होत्या. नवटक्के यांची या प्रकरणात काय भूमिका आहे. त्यांच्यावर कोणत्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेले नाही.

Bhagyashree Navtake
Rane vs Thackeray: Video राजकोट किल्ल्यावर राडा; शिवद्रोही कोण? उद्धव ठाकरे कडाडले

या प्रकरणात पोलिसांनी भाजपाचे जळगावमधील विधान परिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांच्यावर देखील गुन्हा दाखल केलेला आहे. सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना खंडेराव घोरपडे (६५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन या पतपेढीविरुद्ध डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात बीएचआरसी संबंधित अनेकांना अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com