MNS News: विधानसभेपूर्वीच मनसेच्या माजी उपविभाग प्रमुखासह पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली 'तुतारी'

Prakash Jamhadhe resigned MNS join ncp sharad pawar group:शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात ऐन विधानसभेच्या तोंडावर जमधडे यांच्या झालेल्या प्रवेशामुळे पक्षाची या भागात ताकद वाढणार आहे.
Prakash Jamhadhe resigned  MNS join ncp sharad pawar group
Prakash Jamhadhe resigned MNS join ncp sharad pawar groupSarkarnama
Published on
Updated on

Pune News: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये विधानसभेपूर्वीच खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुण्यात वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता वाघोलीतील मनसेचे माजी उपविभाग प्रमुख प्रकाश जमधडे यांनी हाती 'तुतारी' घेतली आहे.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते हवेली तालुका उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनसेचे माजी हवेली तालुका उपाध्यक्ष अतिश ढगे, अक्षय चोपडे, ज्ञानेश्वर गायकवाड, किरण मिंडे, आपचे अंजिक्य शेडगेंसह तालुक्यातील अनेक पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, युवक प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख,जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, हवेली तालुका अध्यक्ष संदीप गोते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

Prakash Jamhadhe resigned  MNS join ncp sharad pawar group
Anita Birje: ठाण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेल्या अनिता बिर्जे शिंदे गटात

शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघात ऐन विधानसभेच्या तोंडावर जमधडे यांच्या झालेल्या प्रवेशामुळे पक्षाची या भागात ताकद वाढली आहे, त्यामुळे याचा नक्कीच फायदा पक्षाला होईल अशी चर्चा सुरु आहे. जमधडे यांनी अगोदर वाघोलीतील विविध सार्वजनिक प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. त्यांनी नुकतीच शिरूर लोकसभा निवडणूक लढवली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com