Savitribai Phule Pune University : पुणे विद्यापीठात नाटकादरम्यान राडा; ललित कला केंद्राचे डॉ. प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक

Pune University News : पुणे विद्यापीठात राडा; आक्षेपार्ह भाषेमुळे 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले नाटक
Pune University News
Pune University NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्र या विभागाकडून सादर केलेल्या नाटकांमध्ये आक्षेपार्ह भाषा वापरली असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. शुक्रवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. या प्रकारामुळे विद्यापीठात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाटकातील संवादातून भावना दुखावल्या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

(Savitribai Phule Pune University)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. 'जब वी मेट' या नावाच्या या नाटकामध्ये रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या नाटकावर आक्षेप घेत या नाटकाचा प्रयोग उधळून लावला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्र नावच्या विद्यार्थ्याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या नाटकामध्ये प्रभू श्रीराम व सीता माता यांची भूमिका विदूषका प्रमाणे दाखवण्यात आली. त्याच बरोबर प्रभू श्रीराम यांना राखी सावंत व देवी देवतांच्या पात्राच्या मुखातून शिव्या आणि आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली. त्यामुळे 'अभाविप' पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका 'अभाविप' पुणे तर्फे घेण्यात आली आहे. या घटनेनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Edit By : Rashmi Mane

Pune University News
Haribhau Rathod News : 'ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत' ; माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा आरोप

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com