Pune News : लग्नाच्या नकाराचा राग तरूणाने काढला राजकीय नेत्यांवर; थेट खंडणीची मागणी!

Threats To Pune Politicians : मुलीच्या इनोव्हात ३० लाख ठेवा..
Vasan More Avinash Bagwe : Mahesh Landge
Vasan More Avinash Bagwe : Mahesh LandgeSarkarnama
Published on
Updated on

मागील काही दिवसांपासून पुण्यातील अनेक पक्षातील विविध राजकीय नेत्यांना, तसेच व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तिंना धमक्यांचे फोन आले होते. एवढेच नाही तर, पुण्यातील बड्या राजकीय नेत्यांना खंडणीच्या धमक्या आल्या होत्या. पुणे पोलिसांनी याचा तपास केला असता, हे सगळं काम पुण्यातील एका व्यक्तीने केलं होतं, असे पुढे आले. या धमकी देणाऱ्या व्यक्तिने हे असं का केलं. ही धमकी देणारी व्यक्ती कोण होती?

पुणे शहरातील प्रतिष्ठित व राजकीय लोकांना व्हॉट्सॲप कॉल येतो आणि खंडणी मागितली जाते. एका महिन्यात पुण्यातील ४ राजकीय नेत्यांना असे कॉल आले आणि हे इथेच न थांबता राजकीय करिअर बरबाद करू, अशा धमक्या देखील मिळाल्या होत्या. भाजप आमदार महेश लांडगे, काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे, यासह मनसे नेते वसंत मोरे यांना सगळ्यांना गेल्या १ महिन्यात खंडणी चे फोन आले.

Vasan More Avinash Bagwe : Mahesh Landge
Mahesh Landage : भोसरीच्या पैलवान आमदारांनाच मागितली ३० लाखांची खंडणी !

आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांच्याकडे ३० लाख रुपयांची खंडणी मागितली गेली होती. महेश लांडगे यांच्या परिवर्तन हेल्पलाईनवर हा मेसेज करण्यात आला होता. काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनाही धमकी देण्यात आली होती. व्हाट्सअपद्वारे कॉलवरून खंडणी मागत खंडणी न दिल्यास बागवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बागवेंना ३० लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली होती. या फोननंतर याप्रकरणी स्वतः अविनाश बागवे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasan More) यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. या धमकीमुळे एकच खळबळ उडाली होती. यावेळी धमकी देणाऱ्यांनी ३० लाखांची खंडणी मागितली गेली होती. आता याप्रकरणी वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी या गोष्टीची गंभीरपणे दखल घेतली आहे. या सर्व हाय प्रोफाईल केसमध्ये आता एक ऑपरेशन राबवलेलं होतं. या प्रकरणात आता २ जणांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. यातील मुख्य आरोपीचं नाव आहे इम्रान शेख आणि याचा या गुन्ह्यातील साथीदार शाहनवाज खान यालाही ताब्यात आहे. ताब्यात घेतलेला आरोपी इम्रान शेख हा मनसे वसंत मोरे यांना धमकी दिल्याप्रकरणी तरूंगात जाऊन आला आहे.

Vasan More Avinash Bagwe : Mahesh Landge
Pune Crime News : गर्लफ्रेण्डचा लग्नाला नकार अन् राजकीय नेत्यांना धमकीचे काॅल; काय आहे प्रकरण?

इम्रान शेख हा पुण्यातच वास्तव्याला असून, तो विवाह नोंदणी केंद्र चालवत असे. या ठिकाणी एका मुलीने लग्नासाठी नोंदणी केली होती. मात्र इम्रान स्वत:च्या मुलीच्या प्रेमात पडला. मात्र संबंधित मुलीने स्पष्ट नकार दिला.

संबंधित मुलीने दिला नकार दिला, याचा राग येऊन इम्रानने तिची बदनामी करायला सुरू केली. संबंधित मुलीचे फोटो आणि मोबाईल सोशल मिडियावर सार्वजनिक केले. अशामुळे पोलीस या मुलीवर कारवाई करतील, असा उद्देश इम्रानचा होता. मात्र इम्रानच्या उद्देशाप्रमाणे असं काहीच नाही, असं काहीच घडलं नाही. आरोपी इम्रानने संबंधित तरूणीच्या नावाने राजकीय नेत्यांना खंडणी मागायला सुरुवात केली. यात वेगळी गोष्ट म्हणजे, धमकी देतेवेळी मुलीच्या गाडीत पैसे ठेवा, अशा रितीने तो संबंधित मुलीची बदनामी करायचा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com