पुणे-पिंपरी चिंचवडसाठी 'मविआ'चे ठरले! सचिन अहिरांनी स्पष्ट केली भूमिका

Pune | PCMC Municipal Corporation | Election : भाजपच्या अॅक्शन प्लॅनकडे लक्ष
 Sachin Ahir
Sachin Ahirsarkarnama

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांसाठी (Pune and PCMC Municipal Corporation Election) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) फॉर्म्युला फिस्क असून दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी-शिवसेना युती होणार असल्याचे विधान शिवसेनेचे पुण्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी केले आहे. पण जागावाटपासंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसून या दोन्ही संदर्भातला अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्याकडून घेतला जाईल असेही अहिर यांनी सांगितले.

 Sachin Ahir
जयश्री जाधवांच्या विजयाची जबाबदारी शिवसेनेची; कामाला लागा : ठाकरेंचा क्षीरसागरांना आदेश

सचिन अहिर म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी निश्‍चित होणार आहे. राष्ट्रवादीने (NCP) शिवसेनेबरोबर (Shivsena) युती करण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीला राष्ट्रवादी काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्राथमिक चर्चा सकारात्मक झाली आहे. मात्र यासंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील आणि त्यांच्याकडूनच तो घोषित करण्यात येईल असे असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com