Pune Politics : पुणे महापालिकेच्या निधी वाटपातही लाडका पदाधिकारी योजना? माजी नगरसेवकांमध्ये नाराजी

Pune Politics Mahayuti Vs Mahavikas Aghadi : जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये सत्ताधाऱ्यांना एक आणि विरोधकांना एक न्याय दिला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.
PMC Ajit Pawar, Devendra Fadnavis
PMC Ajit Pawar, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Sep : गेल्या काही दिवसांपासून निधी वाटपामध्ये होत असलेला भेदभावामुळे नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये सत्ताधाऱ्यांना एक आणि विरोधकांना एक न्याय दिला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.

अशातच आता पुण्यातील (Pune) अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एकाच पदाधिकाऱ्यांच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पालिकेचा निधी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह भाजपमधील माजी नगरसेवक नाराज झाले आहेत.

जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटप करताना पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून भेदभाव होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आघाडीच्या तीन आमदारांनी नुकतेच आंदोलन केले होते. विकासकामांनी मिळणारा निधी हा आमच्या हक्काचा असून अशा प्रकारचा भेदभाव करणे हे चुकीचं असल्याचं या आमदारांनी म्हटलं होतं.

PMC Ajit Pawar, Devendra Fadnavis
Aaditya Thackeray : "100 टक्के स्ट्राइक रेट, इथूनच..." मुंबई विद्यापीठाच्या निवडणुकीतील विजयावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

तर यापूर्वीच्या कोणत्याही पालकमंत्र्यांनी असं केलं नव्हतं, असं काँग्रेस आमदार संग्राम थोटे म्हणाले होते. त्यानंतर आता पुणे शहराच्या पूर्व भागातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आल्याचं उघकीस आलं आहे. पदाधिकाऱ्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी वीस ते पंचवीस कोटींचा निधी महापालिकेच्या वित्तीय समितीने मंजूर केला आहे.

PMC Ajit Pawar, Devendra Fadnavis
Rohit Patil : 'भंपक' म्हणल्यानं रोहित पाटील संतापले; संजयकाका पाटलांना घेतलं शिंगावर

सध्या महापालिकेमध्ये प्रशासक राज आहे, त्यामुळे माजी नगरसेवकांना आपल्या प्रभागात निधी मिळवताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकांची देखील निधी मिळवताना दमछाक होत आहे. अशातच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांमध्येही नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे.

अजित पवार महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यावर भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. अजित पवार पालकमंत्री झाल्यास भाजपच्या लोकांना निधी मिळणार नाही अशी भीती स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांनी व्यक्त केली होती. ती भीती खरी होत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील इतर पदाधिकारी देखील नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. वारंवार निधीची मागणी करूनही आपल्याला निधी मिळाला नसल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अनेकदा अजित पवारांनी सूचना देऊनही महापालिका आयुक्तांनी निधी दिला नसल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांकडून करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात लाडक्या पदाधिकारी योजनेची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com