अजित पवारांच्या पीए सोबत ओळख; टेंडर मिळवून देतो म्हणत १० लाखांचा गंडा

Pune Crime news | Ajit Pawar| बंडगार्डन पोलिसांकडून एकाला अटक
Pune Police
Pune Police Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्विय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या भामट्याला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. प्रविण विठ्ठल जगताप असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण जगतापने पुणे महापालिकेत ५ कोटींचे लॉकींग बजेटमधून टेंडर मिळवून देतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए मुसळे यांच्याशी माझी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल. अशी तक्रार महेश पटवर्धन यांनी केली होती. या प्रकरणी जगतापला अटक करण्यात आली.

Pune Police
अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिलेली नाही ; फडणवीसांचा हल्लाबोल

आरोपी जगताप आणि त्याच्या साथीदाराने दिलेल्या ऑफरवर महेश पटवर्धन यांनी विश्वास ठेवत १० लाखांची मागणी केली. पण त्यांनी आपले कोणतेही काम न करता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. जगताप हा स्वतःला सुनील मुसळे आणि माजी मुख्य सचिव भूषण गगरानी यांच्या नावाने शासकीय कंत्राट मिळवून देत असल्याचे सांगत तक्रारदाराकडे 5 कोटींची मागणी करत होता.

पोलिस तपासात त्याने खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर महेश पटवर्धन यांच्या तक्रारीनंतर आरोपी प्रवीण जगतापला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांनी यावेळी सांगितले. आरोपी प्रविण जगताप जगताप याने मंत्रालयातील अनेक मंत्री आणि आधिकाऱ्यांची नावे सांगून अनेकांची फसवणूक केल्याचंही पोलिस तपासात समोर आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com