बलात्काऱ्याला वाचविण्यात पुणे पोलीस व्यस्त - चित्रा वाघांचा आरोप

Raghunath Kuchik| Chitra wagh| या प्रकरणाचे पूजा चव्हाण प्रकरण करु नका"
Raghunath Kuchik| Chitra wagh|
Raghunath Kuchik| Chitra wagh|Sarkarnama
Published on
Updated on

पुणे : "पुणे पोलिस आयुक्त सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. संजय राठोड नंतर रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) प्रकरणात पुणे पोलिसांची (Pune Police) भूमिका संशयास्पद वाटत आहे. या प्रकरणाचे पूजा चव्हाण प्रकरण करु नका" अशी टिका महाराष्ट्र भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केली आहे. तसेच, वर्गात घुसून मुलीवर हल्ला झालेल्या शाळेची मान्यता तपासावी आणि मुलीचा वैद्यकीय खर्च शासनाने उचलावा, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.

पुण्यातील शिवसेना (shivsena)उप-नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार आणि नंतर गर्भपात करायला लावल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत आपली भुमिका मांडली.

Raghunath Kuchik| Chitra wagh|
'खोटे सिक्के खुद नहीं चले बाजार में'; अमोल मिटकरींचा विरोधकांना टोला

" संबंधित तरुणी मागील काही दिवसापासून बेपत्ता आहे. तिच्या जीवाला धोका आहे. पीडित मुलीचे काल इस्लामपूर येथे लोकेशन होते, तर आज पणजी येथे आहे. तिच्या घातपाताची शक्यता मला वाटते आहे. सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचविण्यात पुणे पोलीस आयुक्त व्यस्त आहेत, अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.

तसेच, पूजा चव्हाण प्रकरणाप्रमाणे या तरुणीचे करु नका. संजय राठोडनंतर कुचिक प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिक संशयास्पद वाटत आहे. नागपुर विद्यापीठातील एका विद्यार्थीने प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. हे प्रकार गंभीर आहेत."असेही वाघ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, यावेळी त्यांनी या प्रकरणातील काही गोष्टींकडेही लक्ष वेधले आहे.

- शहरातील 4 ते 5 रुग्णालयात तरुणीचा गर्भपात करण्यासाठी तिला नेण्यात आले होते. त्यापैकी 2 रुग्णालयाची पोलिसांनी चौकशी केली, परंतु एका नामांकित रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी कुचिकने त्याच्या ओळखपत्राचा वापर केला, त्या रुग्णालयाची अद्याप पोलिसांनी चौकशी केलेली नाही.

- तरुणी सापडल्याबाबत पोलिसांकडून सत्ताधारी व विरोधकांना वेगवेगळी उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणातील तरुणी अद्यापही सापडलेली नाही, पोलिस, आम्हीही शोध घेत आहोत, तरुणी सापडली नाही, असे आम्हाला सांगत आहेत.

Raghunath Kuchik| Chitra wagh|
मानसोपचार तज्ज्ञांना दाखवा : अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना टोला

- तर दुसरीकडे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना मात्र तरुणी तिच्या वडिलांसमवेत सुखरूप असल्याचे सांगून आमची दिशाभूल करीत आहेत. सत्ताधारी व विरोधकांना पोलिस वेगवेगळी कारणे सांगत दिशाभूल करणारी माहिती देत आहेत.

याच वेळी त्यांनी सोमवारी (१५ मार्च) वडगाव शेरीतील विद्यार्थीनीवरील चाकू हल्ला प्रकरणात शाळेची मान्यता तपासावी आणि शासनाने उपचाराचा खर्च उचलावा, अशी मागणी केली आहे. वडगाव शेरीतील इनामदार शाळेतील विद्यार्थीनीवर एकाने शाळेत घुसून चाकू हल्ला केला. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घटना घडली. विद्यार्थीनीवर हल्ला झाल्यानंतर ती काही तास रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. पण इनामदार शाळा व्यवस्थापनाने तिला रुग्णालयात नेले नाही, तिच्या वडिलांची वाट पाहात बसले. त्यामुळे या शाळेला खरच मान्यता आहे का ? याची तपासणी करावी. विद्यार्थीनीची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे, कुटुंबाला उपचार परवडणारे नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने तिची जबाबदारी घेऊन उपचाराचा सर्व खर्च उचलावा"अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com