Pune Porsche Accident Case: पोलिसांनी न्यायालयात सादर केली 'एका गुन्ह्याची गोष्ट': दोषारोपपत्रात पाचशे फोटोंचा 'अल्बम'

Pune Porsche Accident Case Five hundred photos in the charge sheet: गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग, राजकीय दबाव आदी पुरावे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी दोषारोपत्रात ५०० हून अधिक पाने असलेले फोटो (अल्बम) दोषारोपपत्रात सादर केले आहेत.
Pune Porsche Accident Case
Pune Porsche Accident CaseSarkarnama
Published on
Updated on

सनिल गाडेकर

कल्याणीनगर अपघाताचा पुणे पोलिस विविध अंगाने तपास करीत आहेत.ससून रुग्णालयातील रक्त अदलाबदली प्रकरणी मंगळवारी आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अपघाताची माहिती पोलिस कंट्रोल रूम आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यास न देणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे यापूर्वीच निलंबन करण्यात आले आहे. मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सात आरोपीच्या विरोधात न्यायालयात ९०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दोषारोपपत्रात ५०० हून अधिक फोटो असल्याची माहिती आहे. या प्रकरणात आरोपींच्या विरोधात दाखल असलेल्या गुन्हा सिद्ध करण्यासाठी, गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग, राजकीय दबाव आदी पुरावे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी दोषारोपत्रात ५०० हून अधिक पाने असलेले फोटो (अल्बम) दोषारोपपत्रात सादर केले आहेत.

Pune Porsche Accident Case
Sharad Pawar: MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; '..तर मी स्वत: आंदोलनात उतरेन'

अल्पवयीन मुलांचे वडील विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, आई शिवानी, ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड अशा सात जणांच्या विरोधात दोषारोपपत्र आहे. अपघाताच्या अनुषंगाने प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या, न्यायालयात काय घडले यासह विविध माहिती त्यावर शेअर केली जात होती. या सर्वांचे शिवानी अग्रवाल यांच्या मोबार्इलमधील चॅटींगचे स्क्रीनशॉट पोलिसांनी दोषारोपपत्रात नमूद सादर केले आहेत.

कुठले फोटो आहेत दोषारोपपत्रात

  1. व्हॉटस्अप ग्रुपमधील चॅटींगचे स्क्रीनशॉट यात आहे

  2. आरोपी आणि ससूनमधील डॉक्टरांचे व्हॉट्सअप फोनची माहिती असलेले स्क्रीनशॉट

  3. बाल न्याय मंडळ परिसरात आरोपींची ये-जा असलेले सीसीटीव्ही फुटेज

  4. पबच्या बाहेरील सीसीटीव्हीमधील कारचे फोटो

  5. अल्पवयीन मुलगा कधी आला व गेला याची नोंद त्यात आहे

  6. अग्रवाल कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे वकील यात झालेले संभाषण

  7. ससून रुग्णालयात रक्ताचे बदलण्याबाबत झालेल्या गुन्ह्याचे सीसीटीव्ही फुजेट

कोणा विरोधात दाखल आहे दोषारोपपत्र

मुलाचे वडील व बांधकाम व्यावसायिक विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल आणि शिवानी विशाल अगरवाल (दोघे रा. बंगला क्रमांक एक, ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com