Pune News : हिट अॅन्ड रन केसमध्ये राज्यात सत्ताधारी असलेल्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकेची झोड उठवित शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. राज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्यानेच अनेक बार, पब यांच्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या दोन्ही नेत्यांनी केला आहे. 50 खोके घेतलेले शांत बसले असल्याची टीका अंधारे यांनी केली होती. याला शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले आहे.
मंत्री दिपक केसकर यांनी सोमवारी विविध प्रश्नांवर प्रसारसाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत अनेक विषयांवर भाष्य केले. त्यावेळी काँग्रेसचे (Congress) आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अंधारे यांनी केलेल्या टीकेचा त्यांनी समाचार घेतला. केसरकर म्हणाले, खोके तुमच्या नेत्यांकडे आहेत ते चेक करा. या नेत्यांची चौकशी करा, मग त्याचे वास्तव तुमच्यासमोर येईल. हे जे नाटक तुम्ही सुरू केले आहे ते तुमच्यावरच उलटणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुण्यातील कल्याणीनगर भागात घडलेल्या अपघातावर देखील केसरकर यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, या घटनेवरून फालतू राजकारण केले जात आहे. सत्ताधाऱ्यांना विनाकारण अडचणीत आणण्याासाठी विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे.हिट अॅन्ड रन प्रकरण अपघातामध्ये बळी गेलेल्या दोन अभियंत्यांबाबत सहानुभूती ठेवली पाहिजे. कुठलीही गोष्ट कोणाशी तरी जोडण्याचे उद्योग सध्या सर्वत्र सुरू असून हे उद्योग बंद करा, असेही केसकरकर म्हणाले. एक बोट तुम्ही एकाकडे दाखव तेव्हा चार बोट तुमच्याकडे वळलेली आहेत. ज्यांनी आयुष्यात काहीच डेव्हलपमेंटची काम केली नाही ते घेरण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका देखील त्यांनी केली.
दरम्यान, पुणे (Pune) शहरात गेल्या आठवड्यात हा अपघात झालेला असतानाही शहरातील विविध भागात परमिटरूम, बिअरबार, पब सर्रासपणे सुरू असल्याचे वास्तव समोर आले आहे. शनिवारी आणि रविवारी रात्री उशीरापर्यंत शहरातील अनेक पब, बार सुरू असल्याचे समोर आले होते. यावरून आमदार धंगेकर, सुषमा अंधारे यांनी सोमवारी 'एक्साइज'च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. विद्यापीठामध्ये गांजा कसा मिळतोय. कॉलेज समोर बिअरबार, परमीट रूम कसे आहेत, एका बारचा परवाना घेऊन तीन बार चालवलले जात असल्याचे आरोप 'एक्ससाइज'च्या अधिकाऱ्यांवर करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.