Pune Shivshahi Bus case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडे याला पकडण्यासाठी 1 लाखाचे बक्षीस जाहीर

दत्ता गाडेला पुणे पोलिसांची १३ पथके रवाना झाली आहे. पुणे पोलिसांची या १३ पथके गाडे याचा शोध घेत आहेत. दत्ता गाडे याने बलात्कार केल्यानंतर ज्यांच्याशी संपर्क केला, त्या सर्व २० जणांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे.
Pune Shivshahi Bus case
Pune Shivshahi Bus case Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: स्वारगेट बसस्थानकात रिकाम्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद उमटत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकप्रमुख व आगार व्यवस्थापकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

दोषी आढळल्यास तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव यांना परिवहन मंत्र्यांनी दिले आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरवले आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) अद्यापही मोकाट आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. तो सराईत आरोपी आहे. यापूर्वी त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही मुलींना जाळ्यात ओढण्याचा गाडे याने प्रयत्न केल्याचा पोलिसांना संशय आहे.

Pune Shivshahi Bus case
Madhi Kanifnath Yatra: मढी ग्रामपंचायतीची 'त्या' ठरावाने डोकेदुखी वाढवली; आता मंत्री नीतेश राणेंकडे धाव

गाडेला पुणे पोलिसांची १३ पथके रवाना झाली आहे. पुणे पोलिसांची या १३ पथके गाडे याचा शोध घेत आहेत. दत्ता गाडे याने बलात्कार केल्यानंतर ज्यांच्याशी संपर्क केला, त्या सर्व २० जणांचा जबाब पोलिसांनी घेतला आहे. बुधवारी पुणे पोलिसाचे पथक दत्ता गाडे याच्या घरी धडकले होते. विचारपूसही करण्यात आली.

आता पुणे पोलिसांकडून दत्ता गाडे याला पकडण्यासाठी १ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. "फरार दत्ता गाडे याला पकडून द्या अन् एक लाख रूपये मिळवा," असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

Pune Shivshahi Bus case
Bihar Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक अन् जातीय समतोल; या सात जणांना संधी

पुण्यातील वर्दळीच्या ठिकाण असलेल्या स्वारगेट एसटी महामंडळाच्या ‘शिवशाही’ बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची बुधवारी उघडकीस आली. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवला जात आहे. महिला आक्रमक झाल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची स्वारगेट आगाराची तोडफोड केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com