Pune City News : पुण्यातील बालभारती ते पौड रस्ता या प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी वेताळ टेकडीला इजा पोहचणार आहे, यामुळे पुण्यात पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मागील अनेक दिवसांपासून या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या विरोधानंतरही आता हा प्रस्तावित रस्ता कसा असेल, यासाठी संबंधित जागेवर सिमेंटच्या खांबांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
मात्र दुसरीकडे या रस्त्याला वाढता विरोध लक्षात घेऊन, या रस्त्याच्या कामाला उपमुख्यमंत्री देवेंद्न फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्थगिती दिल्याचा दावा भाजपचे स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे(Siddharth Shirole) यांनी केला होता. यामुळे स्थगिती दिली असेल तर सदर जागेवर खांबांची उभारणी करून या प्रकल्पाची चाचपणी घेण्याचं कारण काय? असा सवाल ही पर्यावरण प्रेमींकडून विचारला जात आहे. तर प्रकल्पाबाबत नागरिकांचे गैरसमज दूर व्हावेत, याच हेतूने या खाबांची उभारणी करण्यात येत असल्याचे महापालिकेडून सांगण्यात येत आहे.
वेताळ टेकडीचा किती टक्के भाग हा रस्ता तयार होताना फोडला जाणार आहे. टेकडीचा भाग सोडता इतर भाग टक्के या रस्त्याने व्यापणार आहे. टेकडीवरील किती झाडे या प्रकल्पात येणार आहे. किती झाडांची पुनर्लागवड करण्यात येणार आहे. याचे इत्यंभूत माहिती प्रशासनाकडून पुणेकर नागरिकांना दाखवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील कर्वे रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्ता इथे होणारी वाहतूक कोंडीवर टेकडीच्या मधोमध कर्वे रस्ता ते सेनापती बापट रस्त्यावरील बालभारतीपर्यंत असा रस्ता प्रस्तावित आहे. यामध्ये वेताळ टेकडी फोडून तीन बोगदे तयार करणे, तीस मीटर रूंदीच्या पट्ट्यातील काही झाडे तोडावी लागणार आहे. यामुळे टेकडीवरील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होणार असल्याचे काही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.
यामुळे पर्यावरणाला हानी पोहचेल का? ती हानी पोहचत असेल तर किती प्रमाणात पोहोचेल? याची माहिती देण्यासाठी संबंधित मार्गावर रप्रशासनाकडून खाबांची उभारणी करण्यात येणार आहे. रस्ताच्या ३० मीटर रूंदीच्या अंतरात २५० सिमेंटचे खांब उभारण्यात येणार आहे. यामुळे रस्त्याच्या निर्मितीबाबत पर्यावरणप्रेमी नागरिकांमधील असलेले समज-गैरसमज दूर होतील, असा दावा महापालिका प्रशासनानचे पथ विभागाचे प्रमुख व्ही जी कुलकर्णी यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.