Pune University Flyover : तारीख पे तारीख...कोर्टाची नव्हे, विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाची!

AAP Mukund Kirdak : सत्ताधाऱ्यांवर 'आप'चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांना साधला निशाणा; संथगतीने काम सुरू असल्याने नागरिकांना मनस्ताप
Mukun Kirdak
Mukun KirdakSarkarnama
Published on
Updated on

Pune News : ढिसाळ नियोजन आणि अपयशी राज्यकर्ते असेल की काय होते. याचा अनुभव घ्यायचा असेल तर शहरातील विद्यापीठ चौकात उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचे उदाहरण उत्तम आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये वाहतुकीच्या कोंडीला अडथळा करणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडला गेला. या उड्डाणपुलाचे काम कमीत कमी वेळेत पूर्ण करून हा वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असा शब्द राज्यकर्त्यांनी दिला होता.

मात्र हा उड्डाणपुलाचे काम आणखीच रखडणार असल्याचे समोर आले आहे. संपूर्णपणे महापालिकेत आणि राज्य सरकारमध्ये सत्ताधारी असलेले राज्यकर्ते जबाबदार असल्याची टीका आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.

पुणे विद्यापीठ चौकात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीच्या कोंडीचा त्रास नागरिकांना आणि या भागातून येजा करणाऱ्या वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. या रस्त्यांवर हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम चालू आहे तसेच विद्यापीठ चौकात वाहतुकीची होणारी कोंडी सोडवण्यासाठी येथे दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आलेला आहे.

मात्र याचे काम अद्यापही सुरू न झाल्याने हा उड्डाणपूल होण्यास अजून किमान नऊ ते दहा महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याने त्याचा त्रास वाहनचालकांनाच सहन करावा लागणार आहे. या चौकातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी राज्यकर्ते सपशेल अपयशी ठरले असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mukun Kirdak
Pune Traffic : अरे देवा ! विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी फुटायला अजून 'इतके' महिने लागणार

चार वर्षांपूर्वी कोरोना काळामध्ये हा उड्डाणपूल पाडण्यात आला. हा पूल जमीनदोस्त करताना आम्ही कसे योग्य नियोजन करत आहोत, अशी अशी स्वतःचीच पाठ देखील थोपटून घेण्यात आली. मात्र चार वर्षानंतरही या उड्डाणपुलाचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे या भागातील वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्याने हिंजवडी बाणेर बालेवाडी या भागात असलेल्या आयटी पार्क मध्ये कामगारांना जावे लागते.

त्यामुळे सकाळ, संध्याकाळ या भागात वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले असतात. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी काही रस्ते वनवे करण्यात आलेले आहेत मात्र त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्ते एकेरी केल्याने वाहन चालकांच्या मनस्तापात अधिकच भर पडत असल्याची टीका केली जात आहे.

हा उड्डाणपूल पाडला त्यावेळी स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आघाडीवर होते. कमीत कमी वेळेत हा उड्डाणपूल बांधण्याचे आश्वासन या दोघांनी दिले होते. मात्र, चार वर्षानंतर सुद्धा या बांधकामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीशी अजून पुणेकर रोजची लढाई करीत आहेत. या भागात दररोज होणारी वाहतुकीची कशी सोडवायची याच्यावर अजूनही बैठका आणि केवळ चर्चा केल्या जात आहे. उपाय योजना करण्यास मात्र कोणीही पुढे येत नसल्याची तक्रार आपच्या वतीने करण्यात आली आहे

Mukun Kirdak
Medha kulkarni : मेधा कुलकर्णींची कोथरुडनंतर आता पाषाणमध्ये धाड; नेमकं काय झालं...

...त्याची किंमत मात्र पुणेकरांना मोजावी लागत आहे -

या उड्डाणपुलाच्या कामामुळे या भागात होत असलेल्या वाहतूक प्रश्न, वाहतूक कोंडी तसेच यामुळे नागरिकांना होणारा त्रास यावर ' सरकारनामाने' प्रकाश टाकून नागरिकांना होत असलेल्या त्रासाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर विविध स्तरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या भागात शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे टाटा कंपनीला हे काम देण्यात आले आहे. तर दुमजली दणपण उभारण्याचे काम पीएमआरडीएच्या माध्यमातून केले जाणार आहे. तर काही काम पुणे महापालिकेच्या वतीने केले जाणार आहे.

या सर्व संस्थांमध्ये असलेला संयुक्तिक नियोजनाचा अभाव,तांत्रिक प्रश्न सोडवण्यासाठीची धडाडी, तज्ञता या सगळ्याचाच अभाव यामुळे म्हणून महिने ह्या रस्त्यांवर आणि चौकात वाहतुकीची कोंडी होत असल्याचा आरोप आपचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दतयांनी केला आहे. राज्यकर्त्यांचे अनास्था आणि दुर्लक्ष यामुळे हे काम करत असून त्याची किंमत मात्र पुणेकरांना मोजावी लागत असल्याचेही किर्दत यांनी सांगितले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवत उड्डाणपालच्या उद्घाटनाची तारीख -

पंधरा वर्षांपूर्वी 40 कोटींमध्ये विद्यापीठ उड्डाणपूल बांधला गेला होता. त्याच्या नियोजनामध्ये चुका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मान्य देखील केले होते. नंतर 240 कोटींचा हा नवीन दुमजली उड्डाणपूल बांधण्याचे ठरले. त्याचा अंतिम आराखडा तयार करण्यापूर्वीच हा जुना उड्डाणपूल पाडण्यात आला. या कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे त्याची अंदाजित किंमत आत्ताच 280 कोटीच्या पुढे गेली आहे.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या उड्डाणपालच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली जात आहे. मात्र कामाचा वेग लक्षात घेता हे काम ऑगस्टपर्यंत तरी पूर्ण होईल की नाही, यात शंकाच आहे, असेही किर्दक म्हणाले. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आता यामध्ये लक्ष घालून तातडीने हे काम पूर्ण करून वाहतुकीच्या कोंडी मधून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com