पुणे : शहरात गेल्या काही दिवसातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे टिकेचे धनी झालेल्या पुणे पोलिसांनी गणेशोत्सव आणि विसर्जनाच्या दिवशी चोख बंदोबस्त करीत कमाल केली. गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या चार-पाच दिवसातील गर्दी पाहून आता पुढे काय होणार, याचे उत्तर पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाचे शेवटचे पाच दिवस आणि विसर्जनाच्यादिवशी सुक्ष्म नियोजनाद्वारे गर्दीवर नियंत्रण ठेवत "बेसिक पोलिसींग' काय असते हे दाखवून दाखविले.(Pune Police : Ganeshotsav smoothly handel)
शहरात मागील काही दिवसात सामुहिक बलात्कार, खुन, दरोडे यांसारखे अनेक गंभीर प्रकार घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात होती. त्याचवेळी गणेशोत्सव सुरू झाला. सुरुवातीच्या पाच दिवसातच मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. कोरोनाला निमंत्रण देणारी हि गर्दी ह्दयात धडकी भरत होती. त्यामुळे आता गणेशोत्सवाच्या शेवटच्या चार-पाच दिवसात आणि विसर्जनाच्या दिवशी काय स्थिती असेल, याविषयी नागरीकांमध्ये चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांनी शेवटच्या चार-पाच दिवसात जोरदार सुक्ष्म नियोजन करून, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करीत त्या चर्चेला योग्य उत्तर दिले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी सुरुवातीपासूनच गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. डॉ.शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाच्या 10 ते 15 दिवस आगोदरच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना उत्सवातील "पोलिसींग'चे महत्व पटवून देण्याबाबत मार्गदर्शन सुरू होते. त्याचबरोबर डॉ.शिसवे, परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलिस आयुक्त बजरंग देसाई, सतीश गोवेकर यांनी मंडळांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांनाही गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या. पोलिस त्यामध्ये प्रारंभीच्या दिवसात रस्त्यांवर गर्दी होऊ नये, यासाठी वाहतुक सुरळीत ठेवून पदपथावरुन नागरीकांना जाण्यासाठी व्यवस्था केली. त्यानंतर मोबाईल फोन काढून सेल्फी, छायाचित्रे घेणाऱ्यांना रोखले. तसे करताना आढळल्यास मोबाईल जप्त होतील, असा इशाराही दिला. त्याचबरोबर नागरीकांनी मध्यवर्ती भागात गर्दी करू नये, यासाठी ठिकठिकाणी लाऊड स्पिकरची व्यवस्था करून त्याद्वारे योग्य सुचना देण्यास सुरूवात केली. चौका-चौकातील पोलिसांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना दर तासाचे संबंधीत रस्त्यावरील गर्दीचे व्हिडीओ, छायाचित्रे पाठविण्यास सांगितले जात होते. त्यानंतर शेवटच्या पाच दिवसात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठिकठिकाणी रस्ते बंद करून वाहतुक वळविली. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांनाही माघारी पाठवित गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.