भाजपचे सरकार गेले आणि राहुल कुलांच्या राहू गावात सरपंचपदासाठी चुरस झाली...

..
rahul kul village election
rahul kul village election
Published on
Updated on

राहू :  दौंड तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या आमदार राहुल कुल यांच्या राहू (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या एक जागेसाठी तब्बल 20 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर  17 सदस्यांसाठी  55  उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

पिलाणवाडी ग्रामपंचायतीसाठी सरपंचपदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अकरा सदस्यांसाठी 18 उमेदवारी अर्ज आले आहेत.  तर टेळेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. तर 9  सदस्यांसाठी 26 उमेदवारी अर्ज आले आहेत, अशी माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. एस.  धांडोरे,  दीपक कोकरे,  गिरीश भालेराव यांनी दिली.

अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता.  ग्रामपंचायतीच्या निवडणुका ८ डिसेंबर रोजी होणार आहे. ग्रामपंचायतीचे सरपंचपद प्रथमच थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने मोठी चुरस निर्माण होणार आहे. राहू ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण जागेसाठी असल्याने मोठी चुरस निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वार्ड सहा आहेत. राहू ग्रामपंचायतीसाठी एकूण १७ सदस्य संख्या. ७६०४ इतके मतदार आहेत.

पिलाणवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. एकूण चार प्रभाग आहेत. अकरा सदस्य संख्या आहे. मतदारांची संख्या १५१२ आहे. मात्र या ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ग्रामपंचायतीवर धनगर समाजाचे वर्चस्व आहे.

टेळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. तीन प्रभाग असून नऊ सदस्य संख्या आणि एक सरपंच पदासाठी ही निवडणूक होणार आहे. १२३३ इतके मतदार आहेत.

आमदार राहुल कुल यांची तिनही ग्रामपंचायतीवर  सत्ता आहे. कुल यांच्या बालेकिल्ल्यातील निवडणूका आमदार राहुल कुल यांना बिनविरोध करण्यास यश येणार की या लढती अटीतटीच्या होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडले जाणार असल्याने स्थानिक पातळीवरील  राजकीय विरोधकांनी सुद्धा या ग्रामपंचायतीकडे बारीक लक्ष ठेवून मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.
राहू, पिलाणवाडी, टेळेवाडी या तिन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज ता.22 अर्जाची छाननी करण्यात आली. एकही अर्ज बाद किंवा (अवैद्य) ठरविण्यात आला नाही.

टेळेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. सरपंचपदाच्या उमेदवारीसाठी स्थानिक विरोधकांनी यावेळी आक्षेप घेतला होता. मात्र सदर उमेदवारांच्या कागदपत्राची पुराव्यांची सत्यता पडताळली केली असता तोही अर्ज वैद्य ठरविण्यात आला. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश भालेराव यांनी दिली. 
 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com