Chinchwad Assembly constituency: चिंचवडमध्ये राहुल कलाटेंना आता पहिलवान अंबरनाथ कांबळेंच्या साथीचेही मिळाले बळ!

Ambernath Kamble quits BJP and Join NCP Sharad Pawar party : चिंचवडमध्ये भाजप नगरसेवक पहिलवान अंबरनाथ कांबळे यांची पक्षाला सोडचिठ्ठी; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात केला प्रवेश
Ambernath Kamble
Ambernath Kamble Sarkarnama
Published on
Updated on

PCMC News: चिंचवडमध्ये आजचा राजकीय दिवस गाजला तो जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या रोड शो झाल्याने. चिंचवडमध्ये रोड शोची सांगता करतांना शरद पवारांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी नवी सांगवी भागातील भाजपचे नगरसेवक पहिलवान अंबरनाथ कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

कांबळे यांच्यासह संतोष जाधव, सचिन कुळपकर, प्रविण देवासी, हनुमंत मारकड, दीपक पोटे, मयूर जाधव या भाजपच्या(BJP) प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसेच वंचितचे सुमित भोसले यांनी तुतारी हाती घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला.

शरद पवारांच्या (Sharad Pawar) सभेवेळी चिंचवड विधानसभेत कार्यरत असलेल्या मराठवाडा जनविकास संघ, छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य, पँथर आर्मी, बहुजन व्यासपीठ, धनगर समाज महासंघ या संघटनांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांना जाहीर पाठिंबा दिला.

Ambernath Kamble
Jayant Patil : 'राहुल कलाटे सारखा नेता विधानसभेत गेल्यास संपूर्ण पिंपरी चिंचवडचा सर्वांगीण विकास निश्चित'

चिंचवडचा विकास हवा असेल तर 'सत्ता परिवर्तन' करावेच लागेल, असे आवाहन करत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांना विधानसभेसाठी संधी देण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (ता. 14) वाल्हेकरवाडी येथील सभेत चिंचवडच्या मतदारांना केले. यावेळी उमेदवार राहुल कलाटे, माजी खासदार विदुरा उर्फ नाना नवले, कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, नवनाथ जगताप, मयूर कलाटे, सुनिल गव्हाणे, शिवसेना (उबाठा)चे संजोग वाघेरे, कैलास कदम,

Ambernath Kamble
Sharad Pawar: शरद पवारांनी पुण्यात डाव टाकला! मतदानाच्या सहा दिवसापूर्वीच भाजप नेते गळाला

इम्रान शेख, वंचितचे सुमित भोसले,तुकाराम भोंडवे, गणेश भोंडवे, नवनाथ जगताप, मयूर कलाटे, मच्छिंद्र तापकीर, संपत पवार, देवेंद्र तायडे, सायली नढे, ज्योती निंबाळकर, अनिता तुतारे, वैशाली मराठे, सागर तापकीर, कौस्तुभ नवले, स्वप्निल बनसोडे आदि उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com